Homeचिट चॅट30 सप्टेंबरला पणजीत...

30 सप्टेंबरला पणजीत टपाल खात्याची अदालत

भारतीय टपाल खात्याच्या गोवा क्षेत्रातल्या, पणजीमधल्या पोस्टमास्टर जनरल कार्यालयातर्फे येत्या 30 सप्टेंबरला 63व्या क्षेत्रीय स्तरावरच्या टपाल अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पणजीतल्या पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता ही टपाल अदालत आयोजित केली जाईल.

तक्रारींचे प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने टपाल विभागातर्फे वेळोवेळी अशा लोक अदालतीचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने टपाल विभागाचे अधिकारी पीडित ग्राहकांना भेटून, त्यांच्या तक्रारींची माहिती संकलित करतात आणि त्यांचे लवकरत लवकर निराकरण व्हावे म्हणून कार्यवाहीला सुरुवात करतात. गोवा क्षेत्राशी  संबंधित टपाल सेवांबाबतच्या ज्या तक्रारी 6 आठवड्यांत सोडवल्या गेल्या नाहीत, अशा तक्रारी या अदालतीत हाती घेतल्या जाणार आहेत. या अदालतीत टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँका आणि मनी ऑर्डरच्या न भरलेल्या पेमेंटसंबंधीच्या तक्रारीदेखील ऐकल्या जाणार आहेत.

नोंदवलेल्या तक्रारीमध्ये तारखा, नावे आणि ज्या अधिकाऱ्यांकडे मूळ तक्रार केली होती, त्यांचे पद अशा स्वरुपातील माहिती देणे अपेक्षित आहे. इच्छुक ग्राहक त्यांच्या टपाल सेवांबाबतच्या तक्रारी दोन प्रतींमध्ये सहाय्यक संचालक, टपाल सेवा-1, पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, गोवा क्षेत्र, पणजी- 403001 या पत्त्यावर 20 सप्टेंबर 2025पर्यंत पाठवू शकतात.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content