Homeपब्लिक फिगरजोगेश्वरीतल्या अवैध धंद्यांविरूद्ध...

जोगेश्वरीतल्या अवैध धंद्यांविरूद्ध धडक कारवाई करा!

कोरोनात लॉकडाऊनचा फायदा उचलत मुंबईतल्या जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असतील त्या सर्व ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी सूचना शिवसेनेचे स्थानिक आमदार रविंद्र वायकर यांनी नुकतीच केली. जनतेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने आमदार निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था संदर्भात पोलीस अधिकार्‍यांसमवेत वायकर यांनी त्यांच्या कार्यालयात नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला पोलीस उपायुक्त डॉ. महेश्‍वरी रेड्डी, जोगेश्‍वरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यु. एस. कदम, मेघवाडीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक एस. बी. पिंपळे, एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जे. एस. शिंदे, तसेच जोगेश्‍वरी वाहतूक विभागाचे पोलिस अधिकारी एस. डी. महाले, नगरसेवक बाळा नर, प्रविण शिंदे, विधानसभा संघटक विश्‍वनाथ सावंत, महिला संघटक शालिनी सावंत, उपविभागप्रमुख बाळा साटम, जयवंत लाड, कैलाशनाथ पाठक, जितेंद्र वळवी, समन्वयक बावा साळवी, भाई मिर्लेकर, शाखाप्रमुख मंदार मोरे, सुभाष मांजरेकर, नितिश म्हात्रे, नंदू ताम्हणकर, प्रदीप गांधी आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर अन्य जबाबदारी असल्याने जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील विजय साळस्कर उद्यान, हेमंत करकरे उद्यान, दुर्गानगरच्या मागील आरे कॉलनीच्या भागात, शामनगर तलावाच्या पाठीमागे, म्हाडा कॉलनी मैदान, संजयनगर, मेघवाडी कब्रस्तान शेजारी, इंदिरानगर, तक्षशिला, कोकण नगर आदी ठिकाणी अवैध धंदे, चरस विकणारे, गर्दुले, महिलांची छेडछाड आदी घटनांमध्ये वाढ झाली. यासंबंधात जोगेश्‍वरीतील जनतेने आमदार वायकर यांची भेट घेऊन विभागात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. याची गंभीर दखल घेत वायकर यांनी पोलीस उपायुक्त व संबंधित पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत उपस्थित जनतेने विधानसभा क्षेत्रातील विविध भागात उघडपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांची व यामुळे स्थानिक जनतेला होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. हे अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावेत तसेच निर्जनस्थळी पोलिसांचे पेट्रोलिंग वाढविण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

यावर उपायुक्त डॉ. महेश्‍वरी रेड्डी यांनी, विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या असून असे व्यवसाय करणार्‍यांची नावे पोलिसांनी मिळाली असल्याचे सांगितले. त्यांच्यावर त्वरीत कारवाई करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. विधानसभा क्षेत्रातील निर्जनस्थळांची माहिती काढण्यात आली असून त्या ठिकाणी स्थानिकांना पुरेशा लाईटची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. स्थानिक जनतेच्या मागणीनुसार अनेक ठिकाणी क्युआर कोड तयार करण्यात आले असून ते त्या-त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. संबंधित पोलिस ठाण्याचे बिट मार्शल त्या ठिकाणाला सातत्याने भेट देत असतात. अजून ज्या ठिकाणी क्युआर कोड बसविण्याची मागणी असेल त्यानुसार क्युआरकोड तयार करुन त्या त्या ठिकाणी पोलिसांचे पेट्रोलिंगही वाढविण्यात येईल, असे आश्‍वासनही रेड्डी यांनी दिले.

विधानसभा क्षेत्रातील जनतेचा त्रास कमी करण्यासाठी ज्या भागांमध्ये अवैध पार्कींग करण्यात येते त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, विभागातील गांजा, चरसारखे घातक अंमली पदार्थ विकणारे, अवैध दारुचे अड्डे, दुकाने यांच्यावरही पोलिसांनी तत्काळ धडक कारवाई करावी, अशी मागणी वायकर यांनी यावेळी केली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content