Homeकल्चर +'फक्त मराठी'वर सुपरहिट...

‘फक्त मराठी’वर सुपरहिट चित्रपटांचा खजिना!

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या दर्जेदार मराठी सुपरहिट चित्रपटांची मेजवानी मे २०२१च्या संपूर्ण महिन्यात ‘फक्त मराठी’ वाहिनीच्या प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘फक्त मराठी’ने लॉकडाऊनच्या अवघड काळातही प्रेक्षकांच्या शंभर टक्के मनोरंजनाची कास धरली आहे. संपूर्ण मे महिन्यामध्ये दररोज एक सुपरहिट चित्रपट तसेच ‘साईबाबा श्रद्धा सबुरी’ आणि ‘सप्तपदी’ या लोकप्रिय मालिका ‘फक्त मराठी’वर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.

फक्त मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या एकापेक्षा एक सरस सुपरहिट चित्रपटांबाबत बिझनेस हेड श्याम मळेकर सांगतात की, लॉकडाऊनमुळे सगळ्यांना घरात राहवं लागतं. सर्वांवर विशिष्ट ताण आहे. निरोगी आरोग्यासोबतच मानसिक संतुलन राखण्याचीही या काळात सर्वांना गरज आहे. ही गरज दर्जेदार मनोरंजनातून पूर्ण होऊ शकते. म्हणून आमच्या वाहिनीने सर्वांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या सुपरहिट चित्रपटांची बँक प्रेक्षकांसाठी खुली करण्याचे ठरविले आहे. वाहिनीवर दररोज एका सुपरहिट चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. जास्तीतजास्त लोकांनी बाहेर न पडता, घरात राहून आपल्या आवडत्या चित्रपटांसोबतच ‘साईबाबा श्रद्धा सबुरी’, ‘सप्तपदी’ या मालिका पाहून टेन्शन घालवावं हा वहिनीचा उद्देश आहे. आम्ही मे महिन्यासाठी ३०हून अधिक सुपरहिट चित्रपटांची निवड केली आहे, जे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा गाजलेले आहेत.

फक्त मराठी वाहिनीच्या या लॉकडाऊन स्पेशल महोत्सवामध्ये ‘फर्जंद’, ‘तुकाराम’, ‘दगडी चाळ’, ‘मोरया’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘राजवाडे आणि सन्स’, ‘वाय झेड’, ‘सतरंगी रे’, ‘तुझं तू माझं मी’(TTMM) ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘इश्क वाला लव्ह’, ‘तुझ्याविन मर जावा’, ‘देवा’, ‘संदूक’, ‘मस्का’, ‘गणवेश’, ‘गाभ्रीचा पाऊस’, ‘खेळ मांडला’, ‘मंकी बात’, ‘हॉस्टेल डेज’, ‘आपण यांना पाहिलंत का?’, ‘जन्मदाता’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘तू तिथं मी’, ‘कळत नकळत’, ‘बंदिवान मी या संसारी’, ‘भेट’, ‘सर्वसाक्षी’, सामना’ इत्यादी दर्जेदार सुपरहिट चित्रपटांचा भरगच्च बुके आहे.

आपल्या आवडीचा आजचा चित्रपट कोणता? आणि ‘साईबाबा श्रद्धा सबुरी’, ‘सप्तपदी’ मालिकांमध्ये नेमका कोणता ट्विस्ट असणार हे बघितल्याशिवाय कळणार ती कसं?

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content