महायुतीच्या (राष्ट्रवादी काँग्रेस) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काल पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात पंडित परशुराम मोडक यांच्या वडकी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवणारे मोडक सरसेनापती हंबीरराव मोहिते गोरक्षक दलाच्या माध्यमातून ३४५ देशी गाई व गोवंशाचा सांभाळ करत आहेत. गाडा मालक म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोडक यांच्याकडे शर्यतीचे २ बैलजोड असून त्यांच्या बैलांनी अनेक शर्यती जिंकल्या आहेत. पाच दिवसांपूर्वीच पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीला सुनेत्रावहिनींनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्या स्पर्धेतही पहिला नंबर आल्याचे विवेक मोडक यांनी सांगितले.

यावेळी कल्पना मोडक, मोनिका मोडक, सई मोडक यांच्यासह मोडक कुटुंबीय, महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. “घड्याळा”ला विजयी करण्याच्या मोहिमेत दोन पाऊले पुढेच राहणार असे सांगून त्यांनी महायुतीच्या विजयाची ग्वाही दिली.
देवाची उरळी परिसरात उत्साहात स्वागत
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारदौऱ्याला काल पुरंदर हवेली दौऱ्याला देवाची उरळी परिसरातून सुरुवात झाली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देवाची उरळी येथे त्यांच्या कार्यालयात सुनेत्रावहिनींचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. आम्ही सर्व महायुतीच्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

धनगर समाजाच्या महिलांनी केला काठी आणि घोंगडी देऊन सत्कार
सुनेत्रावहिनींचा प्रचारदौरा पुरंदर हवेली परिसरातील देवाची उरळी येथे सुरू असताना एका धनगर वस्तीवर प्रचारासाठी गेल्या असता धनगर महिला भगिनींनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करत बाळूमामा यांच्या मंदिरात काठी आणि घोंगडी देऊन सत्कार केला. यावेळी महिलांनी आपल्या पाण्यासंदर्भात व इतर अडचणी त्यांना सांगितल्या. या व इतर अडचणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा विश्वास सुनेत्रवहिनींनी दिला.
काळ भैरवनाथ मंदिरातही झाले भव्य स्वागत
सुनेत्रावहिनींनी याच दौऱ्यात असताना उरळी देवाची येथील जागृत काळभैरवनाथ मंदिराला भेट दिली. यावेळी उरळी देवाची ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. सुनेत्रावहिनींनी काळभैरवनाथाचे दर्शन घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघातील जनसामान्याची प्रश्न आणि अडचणी मार्गी लावण्याची ताकद मला दे, असे मागणे मागितले.