Homeबॅक पेजशुक्रवारपर्यंत सादर करा...

शुक्रवारपर्यंत सादर करा हयातीचे दाखले

बृहन्मुंबई महानगरपालिका निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ‘हयातीचे दाखले’ दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक ०१ नोव्‍हेंबर २०२३ ते ०५ मार्च २०२४ या कालावधीत हयातीचे दाखले सादर न करणाऱ्या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी शुक्रवार, १० मे २०२४पर्यंत हयातीचे दाखले पालिका मुख्यालयातील लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन – आय.बी.) विभाग येथे ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत अथवा, केंद्र शासनाच्‍या ‘जीवनप्रमाण’ (www.jeevanpramaan.gov.in) या संकेतस्‍थळाद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्‍तवेतनधारकांच्‍या हयातीच्‍या दाखल्‍यांबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्‍या आहेत. त्‍यानुसार, निवृत्तीवेतनधारकांनी पूर्णतः भरलेले हयातीचे दाखले ऑफलाईन पद्धतीने प्रमुख लेखापाल (कोषागार) कार्यालय, लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन – आय.बी.) विस्‍तारित इमारत, पहिला मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – ४००००१ या पत्त्यावर सादर करावेत अथवा, केंद्र शासनाच्‍या ‘जीवनप्रमाण’ (www.jeevanpramaan.gov.in) या संकेतस्‍थळाद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

दिनांक १० मे २०२४ पर्यंत हयातीचे दाखले ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने प्राप्‍त न झाल्‍यास मे, २०२४ पासूनचे निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन तात्पुरत्‍या स्‍वरूपात स्थगित करण्यात येईल, याची संबंधीतांनी कृपया नोंद घ्यावी, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे कळविण्‍यात येत आहे.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content