Monday, May 12, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजसुब्बिया नल्लामुथू यांना...

सुब्बिया नल्लामुथू यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार

जागतिक दर्जाच्या समांतर सिनेमाच्या जादुई विश्वाला देशभरातील चित्रपट रसिकांच्या जवळ आणणाऱ्या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) काल उद्घाटनाच्या दिवशी प्रख्यात पुरस्कार विजेते वन्यजीव चित्रपटकार सुब्बिया नल्लामुथू यांना यावर्षी व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

माहितीपट आणि भारतामधील ही चळवळ यामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या चित्रपट निर्मात्याला मिफ्फच्या प्रत्येक आवृत्तीमध्ये जीवनगौरवर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 10 लाख रुपये रोखट्रॉफी आणि एक स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 1950च्या दशकात मानद मुख्य निर्माते म्हणून फिल्म्स डिव्हिजनसोबत अतिशय घनिष्ठ संबंध असलेले महान चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार नेहमी पाठीशी असलेल्या आपल्या माता-पित्यांना समर्पित करत असल्याचे सुब्बिया नल्लामुथू यांनी सांगितले.

सात दिवस चालणाऱ्या माहितीपटलघुपट आणि ऍनिमेशनपटांच्या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. मुंबईत नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथे एका अतिशय दिमाखदार आणि झगमगत्या सोहळ्यात याचा प्रारंभ झाला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून दर दोन वर्षांनी आयोजित होणारा आणि या मंत्रालयाची नोडल संस्था असलेल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडून (एनएफडीसी) व्यवस्थापन होत असलेला हा प्रतिष्ठेचा चित्रपट महोत्सव चित्रपट निर्मातेउद्योगातील व्यावसायिक आणि चित्रपट रसिकांना एकसमान समृद्ध अनुभवाची हमी देतो. यावर्षी मिफ्फने एकाच वेळी भारतातील पाच शहरांमध्ये चित्रपट प्रदर्शन आणि लाल गालिचावरील कार्यक्रमांचे आयोजन करून महोत्सवाची व्याप्ती वाढवली आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा सत्रासाठीचे ज्युरी सदस्य केको बँगबार्थेलेमी फोगियाऑड्रिअस स्टोनीसभरत बाला आणि मानस चौधरी यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्पर्धा ज्युरी सदस्य ॲडेल सीलमन-एगेबर्टडॉ. बॉबी सरमा बरुआअपूर्व बक्षीमुंजाल श्रॉफ आणि अॅना हेन्केल-डोनर्समार्क यांचाही सत्कार करण्यात आला. रणदीप हुडा, दिव्या दत्तामधुर भांडारकर, सोनाली कुलकर्णी आणि इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

चार्ली हॅमिल्टन जेम्स दिग्दर्शित “बिली अँड मॉलीॲन अटर लव्ह स्टोरी” या नॅशनल जिओग्राफिकच्या माहितीपटाच्या भारतातील प्रीमियरने महोत्सवातील स्क्रिनिंगला प्रारंभ झाला. या चित्रपटात  प्रेमाची अमर्याद सखोलता  तसेच  मानव आणि निसर्ग यांच्यातील अगाध बंधांचे चित्रण आहे. यावेळी नेटफ्लिक्स इंडिया आणि माहिती आणि  प्रसारण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या आजादी की अमृत कहानिया या विशेष कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. ही सामाजिक क्षेत्रात नवाचार आणणाऱ्या नायकांची कथा सांगणारी सिरीज असणार आहे.

भव्य उद्घाटन समारंभात सांस्कृतिक कलात्मक वैविध्यपूर्ण मेळ दिसून आला. त्यामध्ये भारतीय ॲनिमेशनचा प्रवास दर्शवणारा अभिनयश्रीलंकेचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा “सनफ्लॉवर्स वेर द फर्स्ट वन टू नो” या लघुपटाच्या प्रदर्शनाचा समावेश होता. या वर्षीच्या 77व्या कान चित्रपट महोत्सवात या लघुपटाने ला सिनेफ पुरस्कार पटकावला होता.

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका रंगिका जिवंथा यांनी तयार केलेल्या श्रीलंकन कलात्मकतेच्या 45 मिनिटांच्या सादरीकरणाने श्रीलंकन सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रतिष्ठित रिवेगा डान्स स्टुडिओच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या मोर नृत्याने या राजसी पक्ष्याचे सौंदर्य जिवंत केले. पारंपरिक वान्नामा नृत्याने प्रेरित या सादरीकरणात सुबक हालचाली आणि नादिका वेलीगोडापोला यांनी संगीतबद्ध केलेले मंत्रमुग्ध करणारे संगीत होते. या सादरीकरणात श्रीलंकन फ्यूजन डान्स धरणी‘ आणि एक मनमोहक लोकनृत्य गामी असिरिया‘ यांचाही समावेश होता.

श्रीलंकेच्या सादरीकरणानंतर, क्रेझी किंग्ज डान्स क्रूने भारतीय ॲनिमेशनचा इतिहास सांगणारा 15 मिनिटांचा आकर्षक प्रवास सादर केला. इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 9 आणि हिपॉप इंडिया टॉप 12च्या या धडाडीच्या गटाच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांनी प्रेक्षकांना भारावून टाकले. त्यांच्या सादरीकरणात ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्स आणि डिस्नेनिकेलोडियनसोनी आणि कार्टून नेटवर्कसारख्या आयकॉनिक स्टुडिओमधील कॅरेक्टर मॅस्कॉट्सनी सर्व वयोगटातील ॲनिमेशन उत्साही लोकांना जुन्या आठवणींचा एक आनंददायी प्रवास उलगडून दाखवला.

संध्याकाळी भारतातील पहिले डान्सिंग आयकॉन्स आणि डान्स प्लस सीझन 1चे विजेते यांच्या व्ही कंपनीने सादर केलेल्या 15 मिनिटांच्या दमदार सादरीकरणाने उद्घाटन सत्राचा समारोप झाला. उत्साही दमदार नृत्यशैली आणि प्रेरणादायी कथेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या प्रख्यात क्रूने सामान्य पार्श्वभूमी ते भारतातील सर्वात प्रसिद्ध नृत्य गटांपैकी एक बनण्यापर्यंतचा आपला प्रवास यातून मांडला.

मिफ्फ 18ची ही काही वैशिष्टं..

  • यंदाच्या मिफ महोत्सवात 59 देशांचे 61 भाषांमधील एकूण 314 चित्रपट प्रदर्शित केले जाणार. यामध्ये 8 जागतिक प्रीमियर, 5 आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 18 आशिया प्रीमियर आणि 21 भारत प्रीमियर्सचा समावेश.
  • मुंबईत FD-NFDC कॉम्प्लेक्स येथील प्रमुख आयोजन स्थळाव्यतिरिक्त दिल्ली (सिरीफोर्ट ऑडिटोरियम), चेन्नई (टागोर फिल्म सेंटर)पुणे (NFAI सभागृह) आणि कोलकाता (SRFTI ऑडिटोरियम) येथे MIFFचे स्क्रिनिंग (चित्रपट प्रदर्शन) आयोजित केले जाईल.
  • चित्रपट निर्माते संतोष सिवनऑड्रिअस स्टोनीसकेतन मेहतारिची मेहताटी.एस. नागभरणाजॉर्जेस श्विजगेबेल आणि यासारख्या चित्रपट उद्योगातील दिग्गजांबरोबर 20 मास्टरक्लास (प्रशिक्षण वर्ग), संभाषण सत्रे आणि पॅनेल चर्चा सत्रांचे आयोजन.
  • इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्युसर्स असोसिएशन (आयडीपीए)च्या सहयोगाने NFDC कॉम्प्लेक्स येथे ॲम्फीथिएटरमध्ये ओपन फोरम (खुल्या) चर्चा सत्रांचे आयोजन. राष्ट्रीय स्तरावर ख्यातनाम, चित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्तींचा सहभाग.
  • नोंदणीकृत सहभागींसाठी ॲनिमेशन आणि VFX पाइपलाइनवरील कार्यशाळा.
  • चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या प्रकल्पांसाठी खरेदीदार, प्रायोजक आणि सहयोगी शोधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करूनचित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी प्रथमच ‘डॉक (DOC) फिल्म बझार’चे आयोजन.
  • ऑस्कर आणि बर्लिन चित्रपट महोत्सवातील चित्रपट, ॲनिमेशन चित्रपट, नामांकित संस्थांमधील विद्यार्थ्यांचे चित्रपट आणि NFDC-नॅशनल फिल्म आर्काइव्हज ऑफ इंडिया द्वारे पुनर्संचयित क्लासिक चित्रपटांचे विशेष खेळ.
  • रशिया, जपान, बेलारूस, इटली, इराण, व्हिएतनाम आणि माली या 7 देशांच्या सहयोगाने ‘स्पेशल कंट्री फोकस पॅकेजेस’.
  • अमृत काळातील भारत’ या विशेष संकल्पनेवर आधारित देशाचा विकास, प्रगती आणि समृद्धी प्रदर्शित करणाऱ्या स्पर्धात्मक चित्रपटांचे प्रदर्शन.
  • दिव्यांगजन पॅकेज अंतर्गत दृष्टिहीन आणि श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी चित्रपट.
  • वन्यजीव, मिशन लाइफ आणि आशियाई महिला चित्रपट निर्मात्यांच्या चित्रपटांचे निवडक पॅकेज.
  • स्वयम (Svayam) या स्वयंसेवी संस्थेच्या भागीदारीमधून महोत्सवाचे आयोजन स्थळ दिव्यांगजनांच्या दृष्टीने सहज प्रवेश योग्य बनवण्यात आले आहे.
  • मुंबईत NFDC कॉम्प्लेक्स येथील रेड कार्पेट सोहळ्यांशिवायदिल्ली (17 जून), चेन्नई (18 जून), कोलकाता (19 जून) आणि पुणे (20 जून) येथे विशेष रेड कार्पेट सोहळ्यांचे आयोजन.

मिफ्फ महोत्सवात या चित्रकर्मींना वाहण्यात आली आदरांजली..

  • कुमार सहानी
  • विवान सुंदरम
  • नवरोज कंत्राटदार
  • बी. आर. शेंगडे
  • दीपक हळदणकर
  • के. पी. ससी
  • श्रीयांका रे
  • सौमेंदु रे
  • अनुप मुखर्जी
  • चंदन सर्मा
  • पॉल वॉटसन
  • जॉन पिल्गर
  • मायकेल रोग
  • जेस सर्च

Continue reading

मंगळवारी ठाण्याच्या डॉ. घाणेकर नाट्यगृहात ‘प्री-वेडिंग’!

लव मॅरेज की अरेंज मॅरेज? लग्न करून पाहवं की लग्न करूच नये? पती-पत्नी यांचं नातं कल्पनेत आणि प्रत्यक्षात कसं असतं? अलीकडचे लग्नाच्या वयाचे तरुण-तरुणी या गुंत्यामध्ये अडकलेले असतात. नेमकं काय करावं? त्यांचा गोंधळ उडतो. निर्णय होत नाही. वय वाढत जातं.. आणि मग ठरतं.. 'प्री-वेडिंग'! .....

अडसूळ ट्रस्ट राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत एमडीसी अजिंक्य

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या राज्यस्तरीय सुपर लीग कॅरम स्पर्धेत राज्य ख्यातीचे कॅरमपटू रत्नागिरीची स्वरा मोहिरे, सार्थक केरकर, अमेय जंगम, वेदिका पोमेंडकर यांच्या एमडीसी ज्वेलर्स संघाने अजिंक्यपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात...

भारताविरोधात पाकिस्तान युद्ध पुकारणार?

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना उखडून टाकण्यासाठी भारताने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजूनही चालूच असून पाकिस्तानचा एकूण पवित्रा पाहता लवकरच पाक भारताविरोधात युद्ध पुकारण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या राष्ट्राविरोधात युद्ध पुकारण्याचे पाप आपल्या माथी येऊ नये, मात्र युद्ध पुकारण्यासाठी पाकला भाग...
error: Content is protected !!
Skip to content