Homeचिट चॅटश्री उद्यानगणेश मंदिर...

श्री उद्यानगणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धा १० जानेवारीपासून

श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे मुंबई-ठाणे परिसरातील १७ वर्षांखालील इयत्ता १०वीपर्यंत मुले व मुलींच्या शालेय कबड्डी संघांची श्री उद्यानगणेश मंदिर चषक कबड्डी स्पर्धा येत्या १० व ११ जानेवारीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही शालेय कबड्डी स्पर्धा विनाशुल्क प्रवेशाची असून प्रथम येणाऱ्या शालेय मुलांच्या ३२ व मुलींच्या १६ शालेय कबड्डी संघांना प्रवेश दिला जाणार आहे. सहभागी संघांतील सर्व खेळाडूंना विनामूल्य कबड्डी टी शर्टस व अल्पोपहार दिला जाईल.

श्री उद्यानगणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धेच्या मुले व मुली विभागातील अंतिम विजेत्यास रोख रु. ५,०००/- (पाच हजार), अंतिम उपविजेत्यास रोख रु. ३,०००/-, तृतीय क्रमांकास रोख रु. २,०००/- व चतुर्थ क्रमांकास रु. १,०००/- पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम कबड्डीपटू, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड यासाठी वैयक्तिक पुरस्कार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित मुलांच्या किंवा मुलींच्या शालेय कबड्डी संघांनी प्रवेशअर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी अध्यक्ष व स्पर्धाप्रमुख प्रकाश परब अथवा व्यवस्थापक संजय आईर (८६५५२३३७७८), श्री उद्यान गणेश मंदिर कार्यालय (०२२-२४४६६६३४), स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर-पश्चिम, मुंबई-२८ येथे संपर्क साधावा.

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content