Homeकल्चर +पंतप्रधानांकडून आशियाई क्रीडा...

पंतप्रधानांकडून आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या खेळाडूंना मिळणार कौतुकाची थाप!

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये दुपारी सुमारे 4:30 वाजता, आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघातील खेळाडूंशी संवाद साधतील आणि त्यांना संबोधित करतील.

हा कार्यक्रम म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल खेळाडूंचे अभिनंदन करण्याचा आणि त्यांना भविष्यातील स्पर्धांसाठी प्रेरित करण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत 28 सुवर्ण पदकांसह एकूण 107 पदके जिंकली. जिंकलेली एकूण पदके विचारात घेतल्यास भारताची आशियाई खेळांमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

या कार्यक्रमाला आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघातील खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिकारी, राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे प्रतिनिधी, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content