Homeकल्चर +दक्षिणेचा सुपरहिट 'गीता' आजपासून...

दक्षिणेचा सुपरहिट ‘गीता’ आजपासून मराठीत!

बेवारस मुलांची कोणी फुकट जबाबदारी घेत नाही. त्यांचं शोषण करून त्यांच्याकडून भरभरून कसा फायदा मिळवता येईल हा विचार समाजातील बहुतांश लोक करत असतात. अशाच बेवारस मुलांच्या शोषणावर आधारित तेलगू चित्रपट ‘गीता’ आजपासून, ९ ऑक्टोबर २०२३पासून ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीवर मराठीत पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन विश्व आर राव यांनी केले असून चित्रपटात महाराष्ट्राची हेबा पटेल आणि तेलगू सुपरस्टार सुनील यांनी अभिनय केला आहे. चित्रपटाची कथा गीता या मुलीभोवती फिरते. गीता स्वतः अनाथ असल्याने बेवारस अनाथ मुलांना लोकांनी दत्तक घ्यावं यासाठी प्रयत्न करते. या दरम्यान भगवान नामक व्यक्ती अनाथ मुलांसोबत काहीतरी चुकीचे करतो आहे, याची तिला चाहूल लागते. पोलिसांची मदत घेऊन ती भगवानच्या गैरकृत्याचा पाठलाग करते.

मराठी प्रेक्षक फक्त भाषेमुळे जगातल्या उत्तोमोत्तम मनोरंजनापासून वंचित राहू नयेत म्हणून आम्ही ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीच्या माध्यमातून ‘गीता’सारखे उत्तम चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देत आहोत, असे अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

‘गीता’ चित्रपटाचे प्रोमो पाहण्यासाठी लिंक-

https://www.facebook.com/UltraJhakaas

https://www.instagram.com/ultrajhakaas

https://www.youtube.com/@ultrajhakaas

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content