ज्येष्ठ छायाचित्रकार-पत्रकार घनःश्याम भडेकर यांनी लिहिलेल्या शूट आऊट, या पुस्तकाचे प्रकाशन येत्या २९ एप्रिलला संध्याकाळी ६ वाजता मुंबईच्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते हे प्रकाशन होईल. निव-त्त पोलीस अधिकारी मधुकर झेंडे तसेच ज्येष्ठ पत्रकार वैजयंती कुलकर्णी-आपटे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित असतील.

ग्रंथालीने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्यात भडेकर यांनी त्यांच्या पत्रकारितेत छायाचित्रे काढताना आलेले कथन केले आहेत. २२० पानांच्या या पुस्तकाची किंमत ३०० रूपये असून प्रकाशनाच्या वेळी ते वाचकाला १८० रूपयांना देण्यात येईल.