Homeचिट चॅटआंतर सह. बँक...

आंतर सह. बँक कॅरम स्पर्धेत शिशिर खडपे, गौरी कोरगावकर विजेते

को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबईतर्फे विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रायोजित आंतर सहकारी बँक कॅरम स्पर्धेचे विजेतेपद पुरुष एकेरीत सिटी बँकेच्या शिशिर खडपेने तर महिला एकेरीत अपना बँकेच्या गौरी कोरगावकरने, पुरुष दुहेरीत एनकेजीएसबी बँकेच्या प्रथमेश पवार-अतुल काकिर्डे जोडीने आणि महिला दुहेरीत म्युनिसिपल बँकेच्या उषा कांबळे-संध्या बापेरकर जोडीने पटकाविले.

पहिल्या सेटमध्ये १-० आघाडीसह वर्चस्व राखणाऱ्या गीतेश कोरगावकरला पुढील दोन सेटमध्ये अचूक फटकेबाज खेळ करीत शिशिर खडपेने ५-१२, २५-०, १७-१५ असे चकविले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. दादर-पश्चिम येथील सीबीईयु सभागृहात अपना बँकेची गौरी कोरगावकर विरुध्द म्युनिसिपल बँकेची उषा कांबळे यामधील महिलांचा अंतिम सामना तिसऱ्या सेटपर्यंत रंगला. द्वितीय मानांकित उषा कांबळेने पहिला सेट १५-१० असा जिंकून १-० अशी आघाडी घेतली. उपांत्य फेरीत गतविजेत्या संध्या बापेरकरला २-० असे हरविल्यामुळे हौसला बुलंद झालेल्या गौरी कोरगावकरने दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये जोरदार विजयी पुनरागमन केले. अखेर गौरीने १०-१५, १२-६, २२-७ अशी बाजी मारून अंतिम विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. महिला गटात उषा कांबळे उपविजेती, संध्या बापेरकर व सुप्रिया बने उपांत्य उपविजेते तर सुजाता सोनावणे, वर्षा भगत, साक्षी सरफरे, सुषमा केदार उपांत्यपूर्व उपविजेते ठरले. महिला दुहेरीचे अजिंक्यपद जिंकताना उषा कांबळे-संध्या बापेरकर जोडीने गौरी कोरगावकर-साक्षी सरफरे जोडीचा १०-१२, २०-०, १९-११ असा चुरशीच्या लढतीत पराभव केला.

पुरुष दुहेरीत प्रथमेश पवार-अतुल काकिर्डे जोडीने सोहेल मुकादम-मोबीन शेख जोडीचे आव्हान १२-०, १२-६ असे सहज संपुष्टात आणून विजेतेपद हासील केले. प्रशांत पुळेकर-गणेश सातर्डेकर व दानिश काझी-मिलिंद कीर जोडीने उपांत्य उपविजेतेपद पटकाविले. पुरुष एकेरीत सचिन तावडे व प्रियेश पाठक यांना उपांत्य उपविजेते तर प्रफुल जाधव, अतुल काकिर्डे, सोहेल मुकादम, भार्गव धारगळकर यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद मिळविले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे तसेच इतर पदाधिकारी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे सरचिटणीस नरेंद्र सावंत, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, भार्गव धारगळकर, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर आदी पदाधिकारी कार्यरत होते.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content