महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा, मुंबई येथे आयोजित केलेल्या राज्य बेंचप्रेस स्पर्धेत क्लासिक गटात शेख समीर, नंदिनी उपर, तन्मय पाटील, वैभवी माने, मयुर शिंदे, काजल भाकरे यांनी आपापल्या गटात सर्वोत्तम लिफ्टरचा किताब संपादन केला.
आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी मैदान बचाव समितीचे भास्कर सावंत हेदेखील उपस्थित होते. क्लासिक व इक्वीप या गटात स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेत ३००पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात शासनाने क्रीडा विभागामध्ये विविध पदावर थेट नियुक्त केलेल्या १६ पॉवरलिफ्टिंग खेळाडूंचा विशेष गौरव खेळाडूंचे पालक व प्रशिक्षक यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नामवंत जेष्ठ खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रक्षा महाराव (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी), संजय माधव हेदेखील उपस्थित होते.
क्लासिक स्पर्धा किताब विजेते-
१) सब ज्युनिअर स्ट्राँग मॅन शेख समीर (पालघर), २) सब ज्युनिअर स्ट्राँग वुमन नंदिनी उपर (रायगड), ३) ज्युनिअर स्ट्राँग मॅन तन्मय पाटील (रायगड), ४) ज्युनियर स्ट्राँग वुमन वैभवी माने (सोलापूर), ५) सीनियर स्ट्राँग मयूर शिंदे (पुणे), ६) सीनियर स्ट्राँग वुमन काजल भाकरे (ठाणे), ७) मास्टर १ (४० वर्षांवरील) स्ट्राँग मॅन पोनराज नाडर (मुंबई), ८) मास्टर १ (४० वर्षांवरील) स्ट्राँग वुमन डॉ. शर्वरी इनामदार (पुणे), ९) मास्टर २ (५० वर्षांवरील) स्ट्राँग मॅन सचिन कोचरेकर (ठाणे), १०) मास्टर २ (५०वर्षांवरील) स्ट्राँग वुमन- गीतांजली दस्तूर (मुंबई), ११) मास्टर ३ (६० वर्षांवरील) स्ट्राँग मॅन गुलाम मोहम्मद शेख (मुंबई).
इक्विप स्पर्धेतील किताब विजेते खेळाडू-
१) सब ज्युनिअर स्ट्राँग मॅन वेदांत कदम (ठाणे जिल्हा), २) सब ज्युनिअर स्ट्राँग वुमन सानिका जठार (मुंबई जिल्हा), ३) ज्युनिअर स्ट्राँग मॅन अक्षय प्रजापती (उपनगर मुंबई), ४) जुनिअर स्ट्राँग वुमन सेजल मकवाना (उपनगर मुंबई), ५) सीनियर स्ट्राँग मॅन गणेश तोटे (रायगड), ६) सीनियर स्ट्राँग वुमन काजल भाकरे (ठाणे), ७) मास्टर १ (४० वर्षांवरील) स्ट्राँग मॅन अजिनाथ शेकडे (छत्रपती संभाजी नगर), ८) मास्टर १ (४० वर्षांवरील) स्ट्राँग वुमन डॉ. शर्वरी इनामदार (पुणे), ९) मास्टर २ (५९ वर्षांवरील) मास्टर स्ट्राँग मॅन मनीष कोंढरा (पुणे).