Homeकल्चर +शशांक केतकरच्या 'मुरांबा'चे...

शशांक केतकरच्या ‘मुरांबा’चे ११०० भाग पूर्ण!

स्टार प्रवाहवरील मुरांबा मालिकेने नुकताच ११०० भागांचा टप्पा पार केला. रमा-अक्षय या जोडीसोबतच संपूर्ण मुकादम कुटुंबाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. अक्षय मुकादमची भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने आजवर बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र शशांकच्या करिअरमधली मुरांबा ही सर्वाधिक भागांची मालिका ठरली आहे. शशांकने याविषयी आनंद व्यक्त केला आहे.

कोणताही नवा प्रोजेक्ट सुरु करताना प्रत्येक कलाकाराच्या मनात धाकधुक असते. पण आमचं तसं झालं नाही. कारण, स्टार प्रवाहसारख्या उत्तम वाहिनीचं पाठबळ आणि उत्तम दिग्दर्शकांचं मार्गदर्शन मिळालं. अप्रतिम अशी वाक्यं आमच्या हाती आली आणि धुमधडाक्यात सुरु झाली. आमची मुरांबा मालिका १४ फेब्रुवारी २०२२ला प्रेक्षकांना मिळाली आणि आम्हाला भेटलं मुकादम कुटूंब. या कुटुंबात होती जीवाला जीव देणारे, हसवणारे, रडवणारे, कान पिळणारे, आशीर्वाद देणारे, टाईमपास करणारे आणि कामाच्या वेळेला चोख काम करणारे आमचे मुरांबाचे सदस्य. सगळ्या टीमने सकारात्मकतेने काम केलं की पुरस्कार मिळतातच. पण त्यापेक्षा रमा-अक्षय जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांना प्रेम मिळालं, हे सगळ्यात महत्त्वाचं. पहिल्या दिवसाची धाकधूक आणि आता ११०० भाग पूर्ण केल्यानंतरचा आत्मविश्वास, सगळं अगदी तसंच आहे. स्टार प्रवाह वाहिनी आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार. तुमच्या विश्वासाशिवाय आणि सहकार्याशिवाय हे अशक्य होतं, अशा शब्दात शशांकने आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुरांबा मालिकेचा यापुढचा टप्पा आणखी रंजक आणि उत्कंठावर्धक असणार आहे. रमा-अक्षयच्या आयुष्याला लवकरच नवी कलाटणी मिळणार आहे. त्यासाठी पाहात राहा मुरांबा. दुपारी १.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content