Wednesday, November 6, 2024
Homeएनसर्कलथायलँडमध्ये भारतीय बुद्धविहार...

थायलँडमध्ये भारतीय बुद्धविहार उभारा!

थायलँड हे बौद्ध राष्ट्र आहे. थायलँडमध्ये अनेक बुद्धविहारे आहेत. मात्र थायलँडमध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुद्धविहार आणि महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्यात यावे. त्यासाठी थायलँड सरकारने जमीन द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

बँकॉक येथील दौऱ्यात त्यांनी थायलँडचे संरक्षणमंत्री डॉ. सुतीन कुंगसंग यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी थायलँडमध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुद्धविहार आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्याची मागणी केली. यावेळी थायलँड पंतप्रधान कार्यालयाच्या प्रमुख पीआरओ डॉ. जीब चंत्रास्मी उपस्थित होत्या. त्यानंतर थायलँडमध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुद्ध विहार आणि डॉ. आंबेडकर आंतराष्ट्रीय केंद्रासाठी जमीन थायलँड सरकारतर्फे देण्यात येईल, असे आश्वासन डॉ. कुगसंग यांनी दिले.

महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा प्रसार सम्राट अशोक यांनी केला. जगभर बौद्ध धम्माचा प्रसार त्यांनी केला. सम्राट अशोकानंतर सर्वात मोठे धम्मचक्र प्रवर्तन भारतात बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांनी भारताला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. त्यांनी मानवतेच्या, समतेच्या विचारांसाठी उभारलेला मानवमुक्तीचा लढा; त्यांनी भारतात केलेले धम्मचक्र प्रवर्तन याची जगात नोंद झाली आहे. त्यामुळे थायलँडमध्ये डॉ. आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय केंद्र उभारले पाहिजे, अशी सूचना आठवले यांनी डॉ. कुंगसंग यांना केली.

थायलँडमध्येही आठवलेंचे दिसले व्याघ्रप्रेम

थायलँड दौऱ्यात रामदास आठवले यांनी बँकॉक पट्टाया येथील टायगर पार्कला सहकुटूंब भेट दिली. यावेळी त्यांच्या पत्नी सीमा, पुत्र जित, युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, उद्योजक राज वासनिक आदी मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

आज भाऊबीज (यमद्वितीया)!

आज भाऊबीज. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या...

दिवाळीत आग लागल्यास फोन करा १०१ किंवा १९१६ क्रमांकावर!

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्‍यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. 'दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे...
Skip to content