Homeब्लॅक अँड व्हाईटज्येष्ठ कलाकारांना मिळते...

ज्येष्ठ कलाकारांना मिळते दरमहा 6000 रूपयांचे अर्थसहाय्य

ललित कला आणि संस्कृतीच्या प्राविण्यप्राप्त क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या परंतु वृद्धत्वामुळे आता आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ कलाकारांसाठी सांस्कृतिक मंत्रालय “ज्येष्ठ कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य योजना” या नावाने एक योजना राबवते. या योजनेचा नुकताच आढावा घेण्यात आला आणि जून 2022पासून मासिक आर्थिक सहाय्य रु. 4000/-वरून रु. 6000/- करण्यात आले आहे, अशी माहिती ईशान्य प्रदेशाचे सांस्कृतिक, पर्यटन आणि विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी काल लोकसभेत दिली.

सध्याच्या योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संबंधित लाभार्थी कोणत्याही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित असला तरीही निवडलेल्या कलाकारांना रुपये 6000/- प्रति महिना आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 11233 कलाकारांची निवड करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

केरळ राज्यासह सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील निवडक लाभार्थ्यांना त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे मिळाल्यावर त्यांना आर्थिक सहाय्य वेळेवर वितरित व्हावे यासाठी सरकारचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. योजनेंतर्गत आर्थिक सहाय्याचे वितरण मात्र लाभार्थींनी काही अनिवार्य कागदपत्रे सादर करण्यावर अवलंबून असते. लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर, आर्थिक सहाय्य त्वरित वितरित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातात. लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदतीचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी, मंत्रालय आणि कॅनरा बँक यांच्यात 28.06.2023 रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे, असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content