Homeमुंबई स्पेशलसीमा मानेंनी 'किलीमांजारो'वर...

सीमा मानेंनी ‘किलीमांजारो’वर वाचली भारतीय संविधानाची प्रस्तावना

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्यामधील उद्यान विद्या सहाय्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या व मुंबईतल्या भटवाडी, घाटकोपर येथे राहणाऱ्या सीमा बापू माने ह्यांनी २६ जानेवारी २०२४ रोजी आफ्रिका खंडामधील सर्वात उंच पर्वत माउंट किलीमांजारो सर करून आपल्या देशाच्या संविधानाची प्रस्तावना १९,३४१ फूट (५,८९५ मी) उंचीवर वाचली.

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा जगभर प्रसार करत आहेत. ह्या मोहिमेआधी सीमा माने ह्यांनी बेसिक आणि ऍडव्हान्स माउंटेनिअरींग कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. आपल्या जीवनातील अनेक अडचणींवर मात देत वयाच्या ३८व्या वर्षी अवघ्या २ वर्षांच्या कालावधीमध्ये तिने आंतराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नाव रेखाटले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका उद्यान खात्याचे प्रमुख, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूरमधील 360 एक्सप्लोरर कंपनीमार्फत त्यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली असून भविष्यात माऊंट एव्हरेस्टसहित उर्वरित पाचही खंडातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करण्याचा सीमा माने यांचा निर्धार आहे. याआधी त्यांनी,  हिमाचल प्रदेशमधील फ्रेंडशिप पीक, सिक्कीममधील काब्रू डोम कॅम्प १ सर केले आहे. तसेच सह्याद्रीमधील वजीर पिनॅकल, स्कॉटिश कडा, तैलाबैला, नवरा पिनॅकल, नवरी पिनॅकल, भैरवगड, हरिश्चंद्र गड, कळसूबाई, माहुली गड, व इतर अनेक गड सर केले आहेत. तसेच काश्मीरमधील अवघड तीन तलावांचा तारसार, मारसार आणि सुंदरसार लेक ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केलेला आहे.

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content