Homeन्यूज अँड व्ह्यूजहा पाहा मालाड...

हा पाहा मालाड रेल्वेस्थानकाचा मेकओव्हर!

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकाची दुरुस्ती वा मेकओव्हर गेली तब्बल सात-आठ वर्षे सुरु आहे. (काहींनी तर हे काम सुरु होऊन दहा वर्षे तरी झाली असावीत असा अंदाज व्यक्त केला आहे.) मालाड, कांदिवली व बोरिवली ही वाढणारी रेल्वेस्थानके आहेत हे रेल्वेच्या नियोजन विभागास माहित नाही काय? शिवाय मालाडमधून दररोज लाखो रुपयांचा महसूल मिळत असूनही मलाडाची अशी हेळसांड का? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. तर त्याचे उत्तर आहे की गुळमुळीत व मुळमुळीत लोकप्रतिनिधी. राजकीय नेत्यांच्या कमरेला बांधलेला वा न बांधलेला ‘कटदोरा’ दिसणारी दिव्यदृष्टी असणाऱ्या राजकीय नेत्यांना पाच-दहा स्थानकापालिकडील स्थानक दिसू नये यावर ‘राजकारण’ असे उत्तर दिल्यास तोंडातून काय प्रतिउत्तर उमटेल? याचा ज्याचा त्याने विचार केलेला बरा! पण त्या राजकारणात बिचाऱ्या नागरिकांची आहुती कशाला?

पुन्हा सरकार व महापालिका जागोजागी स्वच्छ मुंबईचे कौतुक करण्यास सज्जही असते. या स्वच्छतेचे गोडवे गाणाऱ्यांनी जरा पश्चिमेकडील सरकत्या जिन्यावरून चढून दाखवावे. सरकत्या जिन्यावरील पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताक्षणी हगीनदारीचा घाण वास तुमच्या नाकात जाऊन तुम्हाला कदाचित गुदमरायला होईल. हगीनदारी तसेच पानाच्या पिचकाऱ्यांनी आजूबाजूच्या भिंती रंगवून टाकलेल्या आहेत. त्या नियोजन समितीने एकदा कुणालाही न कळवता हा तथाकथित मेकओव्हर बघूनच घ्यावा. इतका भोंगळ कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदी सहनच करणार नाहीत याची आम्हाला खात्रीच आहे. मुंबईतील जनता सहशील आहे म्हणूनच आजपर्यंत हे सहन केले आहे. बंगाल किंवा मद्रासमधील जनतेने तर याआधीच कायदा हातात घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना बडवून काढले असते. परप्रांतीयांना मुंबईकर सहन करतच आला आहे. आता त्यांची हगीनदारीही सहन करावी असे दोन्ही सरकारांना वाटते काय? यावर कुणा राजकीय नेत्याने सुंगंधी फवाराचा उपाय सांगू नये म्हणजे पुरवली!!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

गुजरात विकासाचे असेही ‘विकसित वास्तव (मॉडेल)’!

मुंबईसारखीच परिस्थिती ठाणे शहर व आसपासच्या परिसराची झाली आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये! ती परिस्थिती म्हणजे परप्रांतीयांची घुसखोरी! हल्लीच्या भाषेत परप्रांतीय व स्थलांतरित या शब्दांना 'ग्लोबल' वेष्टन लावून विकण्याची पद्धत आहे. पण जे हे ग्लोबल लेबल...

उपायुक्त पाटोळेवरच्या धाडीनंतर झाली ‘मांडवली’?

दसऱ्याच्या आदल्यादिवशी जोरशोरसे सांगून ५० लाख रुपयांच्या लाचेच्या आरोपाखाली ठाण्याचे पालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांना केलेली अटक वा कारवाई ही एक 'फार्स' ठरणार असल्याची माहिती काल सुमारे दोन-अडीच तास ठाणे महापालिका मुख्यालयात फेरफटका मारला असता हाती आली. तक्रारदार मुलुंड...

शुभेच्छांच्या बॅनर्सनी यंदा नवरात्रीत देवी गुदमरली!

गेल्या काही वर्षांपासुन एक लक्षात आले आहे की, सणासुदीचा मोसम सुरु झाला की झाडून सर्व कपंन्या किंमतीत भरीव सूट देणाऱ्या सेलची जाहिरात करत असतात. मग या सेलमध्ये अगदी झाडू, चप्पलपासून उंची साड्या, ड्रेसेसपर्यंत काहीही मिळते. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तर हल्ली...
Skip to content