Homeमुंबई स्पेशलस्टारफिश पाहा मुलुंडच्या...

स्टारफिश पाहा मुलुंडच्या देशमुख उद्यानात!

मुंबई महानगरपालिका, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ५ व ६ यांच्या विद्यमाने नागरिकांसाठी आज, १५ आणि उद्या १६ फेब्रुवारीला मुलुंड पूर्व येथील डॉ. चिंतामणराव देशमुख उद्यान येथे विनामूल्य पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्टारफिश, ऑक्टोपस आदी जलचरांची प्रतिकृती या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.

हे प्रदर्शन सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.०० यादरम्यान भेट देण्यासाठी खुले राहील. यात विविध रोपांची, औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, हंगामी फुलझाडे, फळभाज्या, पालेभाजी वनस्पती यांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करण्यात आलेली आहे. या पुष्प् प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये समुद्रवर्गीय तसेच जलचर प्राणी ही संकल्पना दाखविण्यात आली आहे. जलप्रदूषणामुळे / मानवी हस्तक्षेपामुळे समुद्रातील परिसंस्थेवर होणारे दुष्परिणाम दाखवतानाच नागरिकांमध्ये जलचर प्राणीसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या प्रदर्शनामागचा हेतू आहे.

नागरिकांनी, विशेषतः निसर्गप्रेमींनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देऊन निसर्गाच्या अद्भुत कलाकृतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

हरमित सिंग ठरला ‘खासदार श्री’चा किंग!

मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस... मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेली लाख मोलाच्या बक्षिसांची उधळण, यामुळे ‘खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धे’ने...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः प्रतिका, स्नेह, रेणुकाला रेल्वेकडून बढती!

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली...

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...
Skip to content