मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील महिला एकेरी गटाच्या उपउपांत्य फेरीत माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या संगीता चांदोरकरने आपल्या अनुभवाच्या जोरावर मुंबईच्याच मिताली पाठकवर सहज विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुषांमध्ये उपउपांत्य सामन्यात मुंबईच्या अमोल सावर्डेकरने पुण्याच्या रहिम खानवर अटीतटीच्या लढतीत पहिला सेट गमाविल्यानंतरही दुसरा व तिसरा सेट अनुक्रमे २५-१५, २५-६ असा जिंकून विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.
पुरुष एकेरी उपउपांत्य फेरीचे इतर निकाल असेः
महम्मद घुफ्रान (मुंबई) वि वि सौरभ मते (मुंबई)
प्रशांत मोरे (मुंबई) वि वि पंकज पवार (मुंबई)
विकास धारिया (मुंबई) वि वि समीर अंसारी (ठाणे)
महिला एकेरी उपउपांत्य फेरीचे इतर निकाल असेः
आकांक्षा कदम (रत्नागिरी) वि वि काजल कुमारी (मुंबई)
नीलम घोडके (मुंबई) वि वि अंबिका हरिथ (मुंबई)
रिंकी कुमारी (मुंबई) वि वि केशर निर्गुण (सिंधुदूर्ग)