Homeडेली पल्ससचिन तेंडुलकर राष्ट्रपती...

सचिन तेंडुलकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे!

प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरने काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात सहकुटूंब भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती आणि सचिन यांनी अमृत उद्यानातही फेरफटका मारला. राष्ट्रपती भवनाचा उपक्रम असलेल्या ‘राष्ट्रपती भवन विमर्श शृंखला’अंतर्गत झालेल्या चर्चेतही सचिनने भाग घेतला. क्रिकेटपटू म्हणून त्याने आपल्या प्रवासातील काही प्रेरणादायक किस्से यावेळी राष्ट्रपतींना सांगितले. या चर्चासत्राला उदयोन्मुख खेळाडू आणि विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.

या चर्चासत्रात सचिनने एकभावनेने काम करण्याचे महत्त्व, इतरांची काळजी घेणे, दुसऱ्यांचे यश साजरे करणे, मेहनत, मानसिक व शारीरिक बळ विकसित करणे यासारखे आयुष्य घडविणारे अनेक पैलू उलगडून दाखविले. भविष्यातले कीर्तीमान खेळाडू देशातल्या दूरदूरच्या भागातून, आदिवासी समाजातून आणि फारसा विकास न झालेल्या भागातून आलेले असतील असा विश्वासही त्याने व्यक्त केला.  

Continue reading

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...
Skip to content