Thursday, November 7, 2024
Homeमुंबई स्पेशलसफाई कामगारांच्या विस्थापन...

सफाई कामगारांच्या विस्थापन भत्त्यात ६ हजारांची वाढ

मुंबई महापालिकेच्‍या आश्रय योजना अंतर्गत घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍यातील सफाई कामगारांच्‍या वसाहतींचे पुनर्वसन करताना देण्‍यात येणाऱ्या विस्‍थापन भत्त्यात ६ हजार रूपयांची वाढ करण्‍यात आली आहे. ही वाढ १ जुलै २०२४पासून लागू होणार आहे. तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता करुन सप्‍टेंबर २०२४च्‍या मासिक वेतनात जुलै २०२४ व ऑगस्‍ट २०२४ या दोन महिन्‍यांच्‍या फरक रकमेसह संपूर्ण वाढीव रक्‍कम वेतनाद्वारे अदा केली जाणार आहे. 

सध्या पालिका सेवा सदनिकाधारक सफाई कामगाराला विस्‍थापन भत्ता १४ हजार रूपये आणि दरमहा घरभाडे भत्ता दिला जातो. या भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने विस्‍थापन भत्त्यात ६ हजार रूपयांची वाढ करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे विस्‍थापन भत्ता आता दरमहा २० हजार रूपये करण्यात आला आहे.

ही वाढ दिनांक १ जुलै २०२४पासून लागू होणार आहे. प्रशासकीय तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करुन सप्‍टेंबर २०२४च्‍या मासिक वेतनात जुलै व ऑगस्‍ट महिन्‍यांच्‍या फरक रकमेसह संपूर्ण वाढीव रक्‍कम वेतनाद्वारे अदा केली जाणार आहे, असे पालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. 

Continue reading

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...

ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले,...
Skip to content