Homeबॅक पेजझिप इलेक्ट्रिकच्या महसुलात...

झिप इलेक्ट्रिकच्या महसुलात तिप्‍पट वाढ

झिप इलेक्ट्रिक, या भारतातील आघाडीच्‍या तंत्रज्ञान-सक्षम ईव्‍ही-अॅज-ए-सर्विस प्‍लॅटफॉर्मने आर्थिक वर्ष २४मध्‍ये महसूलात तिप्‍पट वाढीसह उल्‍लेखनीय टप्‍पा गाठला आहे. एशिया-पॅसिफिक २०२४च्‍या झपाट्याने विकसित होणाऱ्या व्‍यवसायांच्‍या संपूर्ण यादीमध्‍ये पहिल्‍या क्रमांकाची कंपनी ठरलेल्‍या झिप इलेक्ट्रिकने २०१९ ते २०२२पर्यंत ३९६ टक्‍क्‍यांचा कंपाऊंड अॅन्‍युअल ग्रोथ रेट (सीएजीआर) संपादित केला आहे. भारतभरात इलेक्ट्रिक स्‍कूटर्सचा अतिरिक्‍त ताफा यशस्‍वीरित्‍या तैनात करत कंपनीने दिल्‍ली एनसीआर, बेंगळुरू व मुंबई अशा सहा प्रमुख महानगरीय शहरांमधील आपली उपस्थिती वाढवली आहे. ११,०००वरून २०,०००हून अधिक इलेक्ट्रिक वेईकल्‍सपर्यंत वाढीमधून कंपनीची शाश्‍वत लॉजिस्टिक्‍स व गतीशीलता व्‍यासपीठाप्रती समर्पितता दिसून येते.

झिप इलेक्ट्रिकचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी आकाश गुप्‍ता म्‍हणाले की, मागील आर्थिक वर्ष आमच्‍यासाठी संस्‍मरणीय ठरले आहे. आमच्‍या महसुलामध्‍ये मागील आर्थिक वर्षाच्‍या तुलनेत जवळपास तीनपट वाढ झाली आहे, ज्‍यामुळे मला आव्‍हानात्‍मक ईव्‍ही लँडस्‍केपमध्‍ये हा टप्‍पा संपादित करणाऱ्या आमच्‍या टीमचा खूप अभिमान वाटतो. अधिकाधिक हब्‍सची भर करत एनसीआर व बेंगळुरूमध्‍ये वाढ करण्‍यासह आम्‍ही यंदा मुंबईमध्‍ये कार्यसंचालनांना सुरूवात केली. अधिक पुढे जात आम्‍ही हैदराबादमध्‍ये आमच्‍या सेवा सुरू करण्‍यास उत्‍सुक आहोत आणि प्रत्‍येक तिमाहीमध्‍ये नवीन शहरामध्‍ये लाँच होण्‍याचे लक्ष्‍य आहे. ताफ्यासंदर्भात आमचा २०,००० वेईकल्‍सची विद्यमान क्षमता पुढील १२ ते १८ महिन्‍यांमध्‍ये १००,००० वेईकल्‍सपर्यंत वाढवण्‍याचा आणि त्‍यानंतर पुढील ३६ ते ४८ महिन्‍यांमध्‍ये ही आकडेवारी ५००,०००हून अधिक वेईकल्‍सपर्यंत नेण्‍याचा आमचा प्रयत्न आहे.

क्विक-कॉमर्स, फुड डिलिव्‍हरी, बाइक टॅक्‍सी, ई-कॉमर्स आणि इतर ऑनलाइन व्‍यवसायांसोबत सहयोग करत कंपनी भारतात १०० टक्‍के इलेक्ट्रिक लास्‍ट-माइल डिलिव्‍हरींच्‍या खात्रीसाठी सक्रियपणे काम करत आहे. झिप इलेक्ट्रिकने जानेवारी २०२३ ते फेब्रवुारी २०२४ या कालावधीदरम्‍यान इलेक्ट्रिक वेईकल्‍सच्‍या माध्‍यमातून ४५ दशलक्षहून अधिक शिपमेंट डिलिव्‍हरीज केल्‍या आहेत, जे पृथ्‍वीवर ७६ लाख झाडांची लागवड करण्‍याइतके आहे. गेल्‍या वर्षभरात कंपनीने ५३,००हून अधिक डिलिव्‍हरी कार्यकारींना इलेक्ट्रिक वेईकलचा अवलंब करण्‍यासह प्‍लॅटफॉर्मवर कमाई करण्‍याची संधी दिली आहे. प्रति राइडर त्‍यांच्‍या मासिक सरासरी कमाईमध्‍येदेखील वाढ झाली आहे, जी प्रतिमहिना २४,००० रूपयांहून अधिक आहे, तसेच पेट्रोल बाइक राइडर्सच्‍या तुलनेत ५० टक्‍क्‍यांहून अधिक बचतदेखील करता येते. त्‍यांच्‍या पर्यावरणास अनुकूल उपक्रमांनी कार्यसंचालनांना सुरूवात केल्‍यापासून कार्बन उत्‍सर्जन २९ दशलक्ष किलोग्रॅमने कमी केले आहे.

Continue reading

युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलचे यश

प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील टीएमसी स्टेडियम, मुंब्रा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलने सर्वाधिक पदके जिंकून शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत ठाणे आणि...

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...
Skip to content