Homeमुंबई स्पेशलमुंबई महापालिका निवडणुकीतले...

मुंबई महापालिका निवडणुकीतले आरक्षण जाहीर!

मुंबई महापालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच २३६ प्रभागांच्या आरक्षणाची सोडत ज काढण्यात आली. ओबीसी आरक्षणाशिवाय काढण्यात आलेल्या या आरक्षणाच्या सोडतीत महिलांसाठी २३६पैकी ११८ जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी १०९, अनुसूचित जातीसाठी आठ तर अनुसूचित जमातीसाठी एक जागा आरक्षित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ‘बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२२’करिता २३६ प्रभागांपैकी ११८ प्रभाग आरक्षित असून, यासाठीचे ‘आरक्षण निर्धारण’ व सोडत आज काढण्यात आली. वांद्रे (पश्चिम) परिसरात असणाऱ्या रंगशारदा नाट्यगृह येथील विद्याधर गोखले सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस व अवर सचिव अतुल जाधव, उपायुक्त (विशेष, निवडणूक) संजोग कबरे, सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, ‘एच पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते, पालिकेचे उप निवडणूक अधिकारी सुधाकर ताडगे यांच्यासह संबंधित अधिकारी– कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

आज संपन्न झालेल्या सोडती दरम्यान प्रभाग क्रमांकाची नांवे लिहिलेल्या चिठ्ठया उचलण्याची कार्यवाही ही ‘एच पश्चिम’ विभागात असणाऱ्या पालिकेच्या लक्ष्मीनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने केली. या सोडतीसाठी गेल्या ३ सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभागनिहाय आरक्षणाच्या आधारे यंदाच्या निवडणुकीसाठी प्राधान्यक्रम निर्धारित करण्यात आला होता.

या अंतर्गत गेल्या ३ सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान ज्या प्रभागांमध्ये संबंधित आरक्षण नव्हते, त्यांना ‘प्रथम प्राधान्यक्रम’ निश्चित करण्यात आला होता. या प्रथम प्राधान्यक्रमानुसार अनुसूचित जातींसाठी १५ प्रभाग आरक्षित करण्यात आले. या १५ प्रभागांपैकी अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असलेल्या ८ जागांसाठी सोडत काढण्यात आली. त्यानंतर अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असणा-या २ जागांपैकी एका जागेकरिता सोडत काढण्यात आली.

आजच्या सोडतीदरम्यान सर्वांत शेवटी २१९ सर्वसाधारण प्रभागांपैकी महिलांसाठी आरक्षित असलेल्या १०९ जागांच्या आरक्षणाचे निर्धारण करण्यात आले. या १०९ जागांपैकी ‘प्राधान्यक्रम १’ नुसार ५३ प्रभाग हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. तर ‘प्राधान्यक्रम २’ नुसार ३३ प्रभाग हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. तर उर्वरित २३ जागांसाठी सोडतीद्वारे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असणारे प्रभाग घोषित करण्यात आले.

या जागांचा तपशील पुढीलप्रमाणे…

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content