Homeमुंबई स्पेशलरस्त्यांकडच्या झाडांखालील पार्क...

रस्त्यांकडच्या झाडांखालील पार्क मोटारी हटवा!

पावसाळ्यात रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या पडून होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्याकरीता मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या वृक्षछाटणीच्या कामांत रस्त्यांच्या कडेला उभ्या (पार्क) असलेल्या मोटारी अडथळा ठरत असून वाहनधारकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला झाडाखाली उभी करू नयेत, असे आवाहन पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

मोटारी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे मान्सूनपूर्व कामांतर्गत मृत/धोकादायक झाडे व फांद्या यांची छाटणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विभागवार नेमलेल्या ठेकेदारामार्फत हे काम करण्यात येत आहे. तथापि बऱ्याच रस्त्यांवर पार्क केलेल्या गाड्यांमुळे ही कामे करताना अडथळा निर्माण होतो. अनेकदा अनावश्यक विवादही उत्पन्न होतो. परिणामी या धोकादायक अथवा मृत झाडांची छाटणी करता येत नाही व ही झाडे अथवा फांद्या पावसात वादळात पडून नागरिकांची जीवित/वित्त हानी संभवते.

नागरिकांनी याकामी सहकार्य केल्यास ही कामे पार पाडून हा धोका टाळता येऊ शकतो. तरी मुंबईतील नागरिकांनी वृक्षछाटणी चालू असलेल्या ठिकाणाहून आपल्या पार्क केलेल्या गाड्या हटवून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागातर्फे करण्यात आले आहे.

मोटारी

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content