रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत देवगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे रिपब्लिकन पक्षातर्फे अभिनंदन केले.

अजित पवार भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाइं महायुतीसोबत आल्यामुळे आमच्या महायुतीची ताकद अधिक वाढली आहे. राज्य सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळावा यासाठी आपण आज अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती रामदास आठवले यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली. अजित पवार आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कोणताही वाद नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.



