Friday, December 27, 2024
Homeपब्लिक फिगर‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ...

‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’च्या उपाध्यक्षपदी रामदास आठवले!

रिपब्लिकन पक्षाचे रष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख जागतिक बौद्ध संघटना असलेल्या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या कायमस्वरूपी जागतिक मानद उपाध्यक्षपदी आज अधिकृत निवड करण्यात आल्याची घोषणा बँकॉक येथे करण्यात आली. बँकॉक येथे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या कार्यकारी परिषदेत आज वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष फॅलोप थेयरी यांनी आठवले यांची वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या जागतिक मानद उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली. यावेळी जगभरातील 60 देशांचे बौद्ध प्रतिनिधी उपस्थित होते. 

वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या जागतिक कार्यकारी समितीच्या दिवसीय धम्म परिषदेला आज, दि. 21 नोव्हेंबर 2023 रोजी बँकॉक येथील हॉटेलमध्ये प्रारंभ झाला. दि. 21ते 23 नोव्हेंबर 2023पर्यंत ही कार्यकारी परिषद चालणार आहे. आज परिषदेच्या पहिल्या दिवशी  आठवले यांची वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या जागतिक मानद उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.

वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट या जागतिक बौद्ध संघटनेला ऐतिहासिक महत्त्व आहे. संपूर्ण जगात वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट प्रमुख बौद्ध संघटना आहे. या संघटनेच्या स्थापना बैठकीला 1950मध्ये बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. दर दोन वर्षांनी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टची जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित केली जाते. 1956मध्ये डॉ. आंबेडकरांनी काठमांडू, नेपाळ येथे आणि 1954मध्ये रंगून ब्रह्मदेश (म्यानमार) येथे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत सहभाग घेतला होता. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बोधिसत्व डॉ. आंबेडकरांनी ऐतिहासिक बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मचक्र प्रवर्तन घडविले. तो वारसा घेऊन आम्ही भारतात आणि जगभरात बौद्ध धम्माचे काम करीत आहोत. जगाच्या कल्याणासाठी जगाला युद्ध नको तो बुद्ध हवा आहे. त्यामुळे बौद्ध धम्माने दिलेल्या शांती, अहिंसा, सत्य, समता या विचारांचा प्रसार करीत बुद्ध धम्माच्या प्रसारासाठी धम्म परिषद आयोजित करणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतात मुंबई आणि दिल्ली येथे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टतर्फे जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित केली जावी, अशी सूचना रामदास आठवले यांनी यावेळी केली.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दि. 20 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर असे 5 दिवस बँकॉक दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सीमा आठवले, पुत्र जित आठवले, युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आहेत.

जगभरात निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीतून जग कसे बाहेर पडून शांतीच्या मार्गावर जाईल; शांती, अहिंसा, मानवता, सत्य, समता, या बुद्ध विचारांचा प्रसार करून जगभर मानव जातीच्या कल्याणासाठी बौद्ध धम्माचा प्रसार वाढवावा याबाबत या आंतराष्ट्रीय बौद्ध परिषदेत विचारविनिमय करण्यात आला. या जागतिक बौद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी यापूर्वीही रामदास आठवले यांची निवड झाली होती. जागतिक उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ 4 वर्षांचा असतो. मात्र यंदा आठवले यांना वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे जागतिक मानद उपाध्यक्षपदाचा बहुमान देण्यात आला असून या पदासाठी कोणतीही कालमर्यादा ठेवण्यात आलेली नाही.

Continue reading

आंतरशालेय जंप रोप स्पर्धेत आशनी, योगिता, झाकीर, स्वयंमला सुवर्ण

मुंबईच्या चेंबूर येथील दि ग्रीन एकर स्कूलमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात आशनी काळे (लोरोटो कॉन्व्हेट), योगिता सामंत (के. जे. सोमय्या कॉलेज) आणि मुलांच्या याच गटात झाकीर अन्सारी, स्वयंम कांबळे (दोघेही...

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...
Skip to content