Homeमाय व्हॉईसभारताच्या एकता आणि...

भारताच्या एकता आणि भक्तीचे प्रतीक म्हणजे अयोध्येतील श्री राम मंदिर!

काश्मीरमधल्या बर्फाच्छादीत शिखरांपासून ते उन्हात न्हाऊन निघालेल्या कन्याकुमारीतील समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, रामनामाच्या जयघोषाने भारतभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. आता अयोध्येतील ऐतिहासिक श्री राम मंदिराच्या स्वरूपात ही भक्ती मूर्त रूप धारण करत आहे. हे भव्य मंदिर केवळ भव्यतेच्या बाबतीतच नव्हे तर देश-विदेशातून आलेल्या योगदानाच्या माध्यमातूनही भारताच्या एकता आणि भक्तीचे प्रतीक म्हणून खंबीरपणे उभे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पना या मंदिरासमवेत प्रतिध्वनीत होत आहे. मंदिराच्या तीर्थयात्रेत राष्ट्राला एकत्र आणत कोणत्याही सीमेपलीकडे जात एक अतूट विश्वास आणि उदारतेचा हे मंदिर दाखला देते.

मंदिराचा गाभारा राजस्थानच्या मकराना संगमरवराच्या मूळ पांढर्‍या नजाकतीने सुशोभित आहे.  कर्नाटकातील चर्मोथी वाळूच्या दगडाने, देवतांच्या मूर्ती घडवल्या आहेत. तर राजस्थानातील बन्सी पहाडपूर येथील गुलाबी वाळूचा दगड प्रवेशद्वारावरील आकृतीमध्ये वापरण्यात आला आहे.

संपूर्ण देशाचे हे योगदान केवळ बांधकाम साहित्यापुरते मर्यादीत नाही, तर त्याही पलीकडे आहे.  गुजरातचा दानशूरपणा ध्वनित करत गुजरातमधून आलेली एक भव्य 2100 किलो वजनाची अष्टधातूची घंटा, मंदिराच्या भव्य दालनात वातावरण नादमय करेल. या दैवी घंटेसोबतच, अखिल भारतीय दरबार समाजाने तयार केलेला नगारा नेणारा 700 किलो वजनाचा रथदेखील, गुजरातने दिला आहे. प्रभू रामाच्या मूर्तीसाठी वापरण्यात आलेला काळा पाषाण कर्नाटकातील आहे.  हिमालयाच्या पायथ्यापासून ते अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या भागांमधून, या तिर्थक्षेत्राचे प्रवेशद्वार म्हणून उभे असलेले नाजूक कोरीवकाम केलेले लाकडी दरवाजे आणि हाती विणलेले वस्त्र आले आहे.

योगदानांची यादी इथेच संपत नाही. पितळेची भांडी उत्तर प्रदेशातील, तर पॉलिश केलेले सागवानी लाकूड महाराष्ट्रातून आले आहे. राममंदिराची कथा केवळ साधने आणि भौगोलिक योगदानाशीच निगडीत नाही. राम मंदिर निर्मितीची ही प्रक्रिया, या पवित्र कामात आपले शरीर, मन, आत्मा आणि कौशल्य ओतलेल्या असंख्य प्रतिभावान कारागीर आणि हस्तकला कारागीरांची कथा विदीत करते.

राम मंदिर हे अयोध्येतील केवळ एक वास्तू नव्हे, श्रद्धेच्या एकत्रित सामर्थ्याचा तो जिवंत वस्तुपाठ आहे. प्रत्येक पाषाण, प्रत्येक कोरीव काम, प्रत्येक घंटा, प्रत्येक वस्त्र-कापड, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ची कथा सांगते. ही कथा भौगोलिक सीमा ओलांडून सामूहिक आध्यात्मिक प्रवासात असंख्य मने परस्परांशी जोडते.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content