Homeकल्चर +रजनीकांतही म्हणतात- 'बॉक्स...

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये “सुपरस्टार” हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला “मस्ट वॉच” म्हणतात आणि त्याला “बॉक्स ऑफिस का बाप” असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले- “काय फिल्म आहे… धुरंधर २! आदित्य धर… बॉक्स ऑफिस का बाप!! रणवीर आणि सर्व कलाकार तसेच क्रू मेबर्स यांचे अभिनंदन. प्रत्येक भारतीयाने पाहायलाच हवी अशी मस्ट वॉच फिल्म. जय हिंद”. दक्षिण भारतातील या सुपरस्टारची दखल घेणे, बॉलीवूडसाठी खूप महत्त्वाचे ठरते. दिग्दर्शक आदित्य धर यांनी रजनींच्या शब्दांनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की ते “शब्दांच्या पलीकडे ग्रेटफुल” आहेत.

रजनीकांत

पाच दिवसांत काय घडले?

आकडे बघितले की डोळेच फिरतात. रिलीजच्या चौथ्या दिवशी, रविवारी धुरंधर: दी रिव्हेंज (हिंदी)ने ₹ १०१ कोटी नेट कमवले. हिंदी चित्रपटाच्या इतिहासात एकाच दिवशी तीन आकडी गल्ला जमवणारा हा पहिलाच चित्रपट ठरला. पाचव्या दिवशी, सोमवारी या चित्रपटाने पठाणला मागे टाकत ₹ ६० कोटी नेट कमवले, जो हिंदी चित्रपटाचा सर्वकालीन सोमवार विक्रम आहे. जागतिक स्तरावर पहिल्या विस्तारित वीकेंडमध्ये ₹ ६७८ कोटींचा आकडा ओलांडला. परदेशात अमेरिकी २१.२५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ₹ २०० कोटी, केवळ चार दिवसांत. मध्य-पूर्वेत बंदी असतानाही हे रेकॉर्ड! उत्तर अमेरिकेत ₹ १३१ कोटींचा वीकेंड- हा भारतीय चित्रपटाचा नवा विक्रम आहे.

चित्रपट आहे तरी काय?

आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ ही स्पाय ॲक्शन थ्रिलर आहे. यात एक भारतीय गुप्तहेर कराचीतील गुन्हेगारी आणि राजकीय नेटवर्कमध्ये घुसखोरी करत २६/११ हल्ल्याचा बदला घेतो. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची रनटाइम जवळजवळ चार तास असूनही प्रेक्षागृहे हाऊसफुल्ल राहिली, हे सर्वात मोठे यश!

रजनीकांत

वादातही विक्रम

दक्षिण भारतात मात्र चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. मद्रास हायकोर्टात बंदीची मागणी करणारी याचिका दाखल झाली. पण या वादानेच उलट जाहिरात केली. रजनींसारख्या सुपरस्टारने केलेली प्रशंसा आणि बंदीची चर्चा यामुळे चित्रपटाची व्हिजिबलिटी आणखी वाढली.

पुढे काय?

या वर्षाच्या उत्तरार्धात रामायण (पार्ट १) येणार आहे, जो अलीकडच्या काळातील सर्वात मोठा चित्रपट मानला जातो. ‘धुरंधर २’ने त्या चित्रपटासाठी लक्ष्य उंचावून ठेवले आहे. थोडक्यात, रजनी जेव्हा “बॉक्स ऑफिस का बाप” म्हणतात, तेव्हा कॅलक्युलेटर बाहेर काढायला नको. आकडेच सारी स्टोरी सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...
Skip to content