Homeडेली पल्सरेल्वेने ८९५ ‘नन्हे...

रेल्वेने ८९५ ‘नन्हे फरिश्तें’ची केली सप्टेंबरमध्ये सुटका!

विविध कारणांमुळे आपल्या कुटुंबापासून विभक्त झालेल्या/हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा जोडण्यामध्ये आरपीएफ महत्वाची भूमिका बजावते. या अनुषंगाने भारतीय रेल्वेने ‘नन्हे फारिश्ते’ ही मोहीम सुरु केली आणि या मोहिमे अंतर्गत, सप्टेंबर-2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या संपर्कात आलेल्या काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 895 पेक्षा जास्त मुलांची (मुलगे-573 आणि मुली-322) सुटका करण्यात आली, आणि त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये परत पाठवण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

रेल्वेची मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) सदैव सज्ज असते. प्रवाशांना सुरक्षित, निर्भय आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी दल चोवीस तास कार्यरत असते. याशिवाय भारतीय रेल्वेला एक सुरक्षित वाहतूक सेवा प्रदान करण्यासाठी हे दल सहाय्य करते. आर पी एफ ने नेहमीच प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाय करून आणि रेल्वेच्या मालमत्तेशी झालेल्या गुन्ह्यांचा वेळोवेळी छडा लावण्याचा प्रयत्न करून देशभरात विखुरलेल्या रेल्वेच्या प्रचंड मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी नेहमीच अगदी चोखपणे पार पाडली आहे.

रेल्वेने सप्टेंबर महिन्यात केलेली कामगिरी

  • मानवी तस्करी आणि ऑपरेशन आहट (AAHT): मानवी तस्करांच्या कुटील कारस्थानांचा प्रभावीपणे प्रतिकार करण्यासाठी, आरपीएफची मानवी तस्करी विरोधी पथके भारतीय रेल्वेमध्ये पोस्ट स्तरावर (ठाणे स्तरावर) कार्यरत आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये मानवी तस्करांच्या तावडीतून 29 जणांची सुटका करण्यात आली, आणि 14 मानवी तस्करांना अटक करण्यात आली.
  • ऑपरेशन ‘जीवन रक्षा’: ऑपरेशन ‘जीवन रक्षा’ अंतर्गत सप्टेंबर 2023 मध्ये रेल्वे मार्ग आणि फलाटावरील 265 प्रवाशांचे प्राण आरपीएफ पथकांची सतर्कता आणि त्यांनी केलेल्या त्वरीत कारवाईमुळे वाचले.
  • महिलांची सुरक्षितता: भारतीय रेल्वे महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. या संदर्भात, “मेरी सहेली” हा उपक्रम लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील महिला प्रवाशांना, विशेषत: एकट्याने प्रवास करणाऱ्या किंवा असुरक्षित महिला प्रवाशांना गुन्हेगारीपासून संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत, 231 मेरी सहेली पथकांनी 13071 रेल्वे गाड्यांमध्ये हजेरी लावली आणि सप्टेंबर 2023 मध्ये 421198 महिला प्रवाशांना सुरक्षेची हमी दिली.

त्याशिवाय, आरपीएफने सप्टेंबर 2023 मध्ये महिलांसाठी आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या 6033 व्यक्ती विरोधात कारवाई केली.

Continue reading

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...
Skip to content