कोकण मराठी साहित्य परिषदेचे १७वे साहित्य संमेलन नुकतेच मॉरिशस येथे झाले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मॉरिशस येथील सभागृहांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत काही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये मुंबई येथील भरारी प्रकाशनच्या चार पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यात लता गुठे लिखित ‘भाव-विभोर’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन झाले.

हे लता गुठे यांचे 21वे पुस्तक असून भरारी प्रकाशनचे 250वे पुस्तक मॉरिशसच्या व्यासपीठावर प्रकाशित झाले हा भरारी प्रकाशनसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण होता. यासह उषा परब यांच्या ‘स्वरसम्राज्ञी’ (एकांकिका), प्रशांत राऊत’ लिखित मिस कॉल’ (कथासंग्रह) व ‘बोली-अबोली’ (काव्यसंग्रह) अशा पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी संमेलन अध्यक्ष विजय कुवळेकर, कोमसापचे अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ मॉरिशस मराठी स्पीकिंग फेडरेशनचे अध्यक्ष नितीन बापू आणि मॉरिशस येथील खासदार असलेस किट्टू उपस्थित होते.

