Homeमुंबई स्पेशलशिवडी-वरळी उन्नतमार्गातील रहिवासी शिरोडकर...

शिवडी-वरळी उन्नतमार्गातील रहिवासी शिरोडकर मंडईत!

शिवडी-वरळी उन्नतमार्ग प्रकल्पातील एल्फिन्स्टन रेल्वे ओंलाडणी पूल बांधकामबाधित ‘जी’ आणि ‘एफ’ साऊथ विभागातील रहिवाशांचे शिरोडकर मंडई येथे पुनवर्सन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या प्रकल्पबाधितांचे शिरोडकर मंडई पुनर्विकास प्रकल्पात उत्तमरीत्या आणि वेळेत पुनर्वसन करण्यात यावे. व्यावसायिक गाळेधारकांसह जास्तीतजास्त प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, अशा रितीने नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृहातील या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस. व्हि. आर. श्रीनिवास, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश लोखंडे, माजी आमदार किरण पावसकर आदी उपस्थित होते.

शिरोडकर मंडई पुनर्विकासात या प्रकल्पबाधित रहिवाशांचे आणि व्यावसायिक गाळेधारकांचे पुनर्वसन करताना, सविस्तर प्रकल्प आराखडा करण्यात यावा. यात जास्तीतजास्त बाधितांचा समावेश करण्यात यावा. इमारतींचे भूसंपादन, रहिवाशांचे करार, मंडई पुनर्विकास प्रकल्पाचा उत्कृष्ट आराखडा याबाबतीत वेळेत कार्यवाही करण्यात यावी. रहिवाशांना द्याव्या लागणाऱ्या भाड्याची महापालिका आणि एमएमआरडीएने चर्चेद्वारे सर्वमान्य अशी निश्चिती करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुनर्वसनाच्या बाधितांच्या अडचणी व म्हणणे विचारात घेण्यात यावे. या उन्नत मार्ग प्रकल्पातील जी साऊथ विभागातील बाधित कुटुंबांना मुख्यमंत्री शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून भेट दिली होती. त्यातील सुमारे तीनशे कुटुंबांना एमएमआरडीएने घरांच्या चाव्या दिल्याची माहिती आमदार सरवणकर यांनी यावेळी दिली.

एमटीएचएल आणि कोस्टल रोड यांना जोडणारा हा उन्नत मार्ग प्रकल्प ३१ टक्के पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीतील चर्चेत खासदार शेवाळे, आमदार कोळंबकर, सरवणकर यांनी यांच्यासह काही रहिवाशांनीही सहभाग घेतला.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content