Tuesday, April 1, 2025
Homeपब्लिक फिगरपंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आंध्र प्रदेशात!


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 8 जानेवारीला आंध्र प्रदेशाच्या दौऱ्यावर जाणार असून तेथे ते 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, 9 जानेवारीला पंतप्रधान ओदिशाला भेट देणार असून तेथे ते 18व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत.

उद्या पंतप्रधान विशाखापट्टणमजवळ पुदिमडाका येथे एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्पाची पायाभरणी करतील. हा प्रकल्प राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनअंतर्गत पहिला ग्रीन हायड्रोजन हब असेल. ओदिशात पंतप्रधान प्रवासी भारतीय एक्स्प्रेसलादेखील झेंडा दाखवून रवाना करणार आहेत.

असा असेल पंतप्रधानांचा आंध्र प्रदेश दौरा

पंतप्रधान आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमजवळ पुदिमडाका येथे नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनअंतर्गत पहिले ग्रीन हायड्रोजन हब असलेल्या अत्याधुनिक एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्पाची पायाभरणी करतील. या प्रकल्पासाठी सुमारे 1,85,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. यामध्ये 20 गिगावॉट नवीकरणीय ऊर्जाक्षमतेमधील गुंतवणुकीचा समावेश आहे. त्यामुळे हे केंद्र 1500 टीपीडी हरित हायड्रोजन आणि हरित मिथेनॉल, हरित युरिया आणि प्रामुख्याने निर्यातीच्या बाजारपेठेसाठी उत्पादित होणाऱ्या शाश्वत हवाई इंधनासह 7500 टीपीडी हरित हायड्रोजन डेरीवेटीव्ज उत्पादन करणारे भारताच्या सर्वात मोठ्या हरित हायड्रोजन उत्पादन केंद्रांपैकी एक ठरणार आहे.

याशिवाय पंतप्रधान आंध्र प्रदेशमध्ये 19,500 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार असून यामध्ये विशाखापट्टणम येथील दक्षिण तटीय रेल्वे मुख्यालयाची पायाभरणी आणि इतर विविध प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूककोंडी कमी होईल, संपर्क व्यवस्था सुधारेल. आणि प्रादेशिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. पंतप्रधानांच्या हस्ते अनकापल्ली जिल्ह्यातील नक्कापल्ली येथे घाऊक प्रमाणावरील औषधनिर्मिती केंद्राची पायाभरणी होणार आहे. विशाखापट्टणम-चेन्नई औद्योगिक कॉरिडॉर आणि विशाखापट्टणम-काकीनाडा पेट्रोलियम, रसायन आणि पेट्रोकेमिकल गुंतवणुकीच्या क्षेत्राजवळ असल्यामुळे या बल्क ड्रग पार्कच्या माध्यमातून हजारो नोकऱ्या निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.

आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील चेन्नई बेंगळुरू औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत कृष्णपट्टणम औद्योगिक क्षेत्र (KRIS सिटी)ची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. कृष्णपट्टणम औद्योगिक क्षेत्र हा राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाअंतर्गत असलेला एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून ग्रीनफिल्ड औद्योगिक स्मार्ट सिटी म्हणून त्याची निर्मिती करणे ही यामागील संकल्पना आहे. या प्रकल्पामुळे अंदाजे 10,500 कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण उत्पादन गुंतवणूक आकर्षित होईल आणि सुमारे 1 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील असा अंदाज आहे.

पंतप्रधानांचा ओदिशा दौरा

पंतप्रधान ओदिशामध्ये 18व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे उदघाटन करणार आहेत. ओदिशा राज्य सरकारच्या भागीदारीसह केंद्र सरकारने 8 ते 10 जानेवारी या कालावधीत भुवनेश्वर येथे 18व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन केले आहे. “भारतीय समुदायाचे विकसित भारतासाठीचे योगदान” ही या वर्षीच्या अधिवेशनासाठी निश्चित करण्यात आलेली मध्यवर्ती संकल्पना आहे. सुमारे 50 देशांतील भारतीय समुदायांच्या सदस्यांनी या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनातील सहभागासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. प्रवासी भारतीय एक्सप्रेस या रेल्वेगाडीला पंतप्रधान दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवतील. ही रेल्वेगाडी खास परदेशातील भारतीय समुदायासाठी असून ती दिल्लीमधील निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून आपला प्रवास सुरु करेल आणि तीन आठवड्यांचा कालावधीत भारतातील विविध धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचे दर्शन घडवेल. प्रवासी तीर्थदर्शन योजनेअंतर्गत प्रवासी भारतीय एक्स्प्रेस चालवली जाईल.

Continue reading

‘मुंबई लोकल’ येत आहे ११ जुलैला!

अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची प्रमुख भूमिका असलेला "मुंबई लोकल" हा चित्रपट येत्या ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. आजवर मराठी चित्रपटात मुंबई लोकल दिसली असली, तरी लोकलच्या...

भारती देसाई, गोपाळ लिंग सन्मानित

भारती देसाई, गोपाळ लिंग यांना "ओम् कबड्डी प्रबोधिनी"ने यंदाचे आपले पुरस्कार जाहीर केले. तेहरान, इराण येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघाचे नेतृत्त्व करून सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या सोनाली शिंगटेचादेखील यावेळी सन्मान करण्यात येईल. स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ...

वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा कुणाल कामराचा हव्यास!

पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायमूर्ती तसेच न्यायव्यवस्था याच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कुणाल कामराची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांना लक्ष्य करत खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा...
Skip to content