Homeटॉप स्टोरीपंतप्रधान नरेंद्र मोदींनी...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवरील प्रोफाईल फोटो बदलला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून हर घर तिरंगा, या भारतीय जनता पार्टीच्या अभियानाला सुरवात केली. याकरीता त्यांनी आज सकाळीच आपल्या एक्स, या समाजमाध्यमावर असलेला प्रोफाईल फोटो बदलत तेथे तिरंग्याचा फोटो लावला आहे.

मोदी

त्याबरोबरच पंतप्रधान मोदींनी जनतेला तिरंग्यासह आपला फोटो एक्सवर ट्विट करण्याचे आवाहनही समाजमाध्यमांवरील नेटकऱ्यांना केले आहे. गेल्या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशाच आशयाचे ट्विट केले होते.

मोदी

आज ९ ऑगस्ट, या क्रांतीदिनापासून १५ ऑगस्ट, या स्वातंत्र्यदिनापर्यंत ङर घर तिरंगा अभियानाची घोषणा भाजपाने केली आहे. महाराष्ट्रात तर राज्य सरकारनेच आजपासून हर घर तिरंगा अभियान हाती घेतले असून या अंतर्गत सरकारने राज्यातल्या अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content