Saturday, July 13, 2024
Homeडेली पल्सपंतप्रधान मोदी आज...

पंतप्रधान मोदी आज जम्मू-काश्मीरमध्ये!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 7 मार्चला जम्मू आणि काश्मीरमधल्या श्रीनगरला भेट देणार आहेत. पंतप्रधानांचे दुपारी 12च्या सुमाराला श्रीनगरच्या बक्षी स्टेडियम येथे आगमन होईल. येथे  ते ‘विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर’ कार्यक्रमात सहभागी होतील.

जम्मू आणि काश्मीरमधील कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान सुमारे 5000 कोटींचा ‘सर्वांगीण कृषी विकास कार्यक्रम’ राष्ट्राला समर्पित करतील. श्रीनगरमधील ‘हजरतबल तीर्थस्थळ एकात्मिक विकास’ प्रकल्पासह स्वदेश दर्शन आणि प्रसाद (तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि अध्यात्मिक वारसा संवर्धन अभियान ) योजनेअंतर्गत 1400 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे पर्यटन क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होईल. ‘देखो अपना देश पीपल्स चॉइस टुरिस्ट डेस्टिनेशन पोल’ आणि ‘चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा कॅम्पेन’ या अभियानांचा प्रारंभ पंतप्रधान करतील. आव्हान आधारित पर्यटनस्थळ विकास (सीबीडीडी) योजनेंतर्गत निवडलेल्या पर्यटनस्थळांची घोषणाही पंतप्रधान करतील. याशिवाय, जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारी नोकरीत भर्ती झालेल्या सुमारे 1000 नवीन उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण पंतप्रधान करतील आणि विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील, ज्यात महिला, लखपती दीदी, शेतकरी, उद्योजक इत्यादींचा समावेश आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणारे ‘सर्वांगीण कृषी विकास कार्यक्रम’ पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. ‘सर्वांगीण कृषी विकास कार्यक्रम’ (एचएडीपी) हा जम्मू आणि काश्मीरमधील फलोत्पादन, कृषी आणि पशुपालन या कृषी-अर्थव्यवस्थेच्या तीन प्रमुख क्षेत्रांमधील क्रियाकलापांचे सर्व घटक असलेला एकात्मिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे समर्पित दक्ष किसान पोर्टलच्या माध्यमातून सुमारे 2.5 लाख शेतकऱ्यांचा कौशल्य विकास अपेक्षित आहे. या कार्यक्रमांतर्गत, सुमारे 2000 किसान खिदमत घरांची स्थापना केली जाईल आणि शेतकरी समुदायाच्या कल्याणासाठी मजबूत मूल्य साखळी तयार केली जाईल. या कार्यक्रमामुळे जम्मू आणि काश्मीरमधील लाखो अल्पभूधारक कुटुंबांना  फायदा होईल.

पंतप्रधान

देशभरातली महत्त्वाची धार्मिक स्थळे आणि पर्यटनस्थळे यांना भेट देणाऱ्या पर्यटक आणि यात्रेकरूंचा या स्थळांविषयी येणारा एकूण अनुभव, या ठिकाणी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि इतर सुविधा निर्माण करून सुधारणे, हे पंतप्रधानांचे ध्येय आहे. या अनुषंगाने स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनेअंतर्गत 1400 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध उपक्रमांचे राष्ट्रार्पण आणि प्रारंभ पंतप्रधान करतील. 

हजरतबल दर्ग्याला भेट देणाऱ्या यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि सोयी निर्माण करण्यासाठी आणि त्यांची सर्वांगीण आध्यात्मिक अनुभूती वाढवण्यासाठी, ‘हजरतबल दर्ग्याचा एकात्मिक विकास’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. तीर्थक्षेत्राच्या कुंपणभिंतीच्या बांधकामासह संपूर्ण क्षेत्राचा विकास समाविष्ट आहे; हजरतबल दर्गा परिसरात रोषणाई; सभोवतालच्या घाट आणि देवरी मार्गांची सुधारणा; सुफी अन्वयार्थ केन्द्राचे बांधकाम;  पर्यटक सुविधा केंद्राचे बांधकाम; संकेतचिन्हांची स्थापना;  बहुमजली वाहनतळ; सार्वजनिक सुविधा विभाग आणि दर्ग्याच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम; इतर यांचा प्रकल्पाच्या प्रमुख घटकांमध्ये समावेश आहे.

देशभरात तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळांचा पट व्यापक करणाऱ्या सुमारे 43 प्रकल्पांचे लोकार्पणही पंतप्रधान करतील. यामध्ये आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील अन्नावरम मंदिर; तमिळनाडूच्या तंजावर आणि मायिलादुथुराई जिल्ह्यातील नवग्रह मंदिरे आणि पुद्दुचेरीच्या कराईकल जिल्ह्यातील; श्री चामुंडेश्वरी देवी मंदिर, म्हैसूर जिल्हा, कर्नाटक; करणी माता मंदिर, बिकानेर जिल्हा राजस्थान; माँ चिंतपूर्णी मंदिर, उना जिल्हा, हिमाचल प्रदेश;  बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्च, गोवा, अरुणाचल प्रदेशातील मेचुका ॲडव्हेंचर पार्कसारख्या इतर विविध स्थळांचा आणि अनुभव केंद्रांचाही समावेश आहे. गुंजी, पिथौरागढ, उत्तराखंड येथे ग्रामीण पर्यटन क्लस्टरचा अनुभव; अनंतगिरी जंगल, अननाथगिरी, तेलंगणा येथे इकोटूरिझम झोन; सोहरा, मेघालय येथे मेघालय वय गुहेचा अनुभव आणि धबधब्याचा अनुभव; सिन्नमारा टी इस्टेट, जोरहाट, आसामची पुनर्कल्पना;  कांजली वेटलँड, कपूरथला, पंजाब येथे इकोटूरिझम अनुभव; जुली लेह जैवविविधता पार्क, लेह, यांचाही यात समावेश आहे.

पंतप्रधान

निकष आधारित स्थळ विकास (सीबीडीडी) योजनेअंतर्गत निवडलेल्या 42 पर्यटनस्थळांची घोषणा पंतप्रधान यावेळी करतील. पर्यटन क्षेत्रात शाश्वतता आणि स्पर्धात्मकतेला चालना देतानाच पर्यटनस्थळांच्या विकासाला चालना देऊन संपूर्ण पर्यटनाचा अनुभव प्रदान करणे हा केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 दरम्यान जाहीर केलेल्या या नाविन्यपूर्ण योजनेचा उद्देश आहे. या 42 स्थळांची निवड चार श्रेणींमध्ये केली (16 संस्कृती आणि वारसा स्थळे; 11 आध्यात्मिक स्थळे; पर्यावरण पर्यटन आणि अमृत धरोहर; आणि 5 चैतन्यशील गावे) आहे.

देशवासीयांची पर्यटनाबाबतची नेमकी नाडी ओळखण्यासाठी पहिल्यांदाच ‘देखो अपना देश पीपल्स चॉईस 2024’ या देशव्यापी उपक्रमाचा प्रारंभ पंतप्रधान करणार आहेत. आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारसा, निसर्ग आणि वन्यजीव, साहस आणि इतर अशा 5 पर्यटन श्रेणींमधील पर्यटकांच्या धारणा समजून घेण्यासाठी तसेच सर्वाधिक पसंतीची पर्यटनस्थळे जाणून घेण्यासाठी नागरिकांशी संवाद साधणे हा या देशव्यापी मतचाचणीचा उद्देश आहे. चार मुख्य श्रेणींव्यतिरिक्त, ‘इतर’ या श्रेणीत, एखादी व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक आवडत्या श्रेणीला मतदान करू शकते आणि अज्ञात पर्यटन आकर्षणे, सरहद्दीवरील चैतन्यशील गावे, आरोग्यदायी पर्यटन, विवाह समारोह पर्यटनसारख्या स्थळांच्या स्वरूपात लपलेली पर्यटन रत्ने उघड करण्यात मदत करू शकते. हा मतचाचणी उपक्रम केन्द्र सरकारच्या मायजीओव्ही मंचावर, नागरिक सहभाग पोर्टलवर आयोजित केला जात आहे.

भारतीयांना अतुल्य भारताचे राजदूत होण्यासाठी प्रेरित करणे आणि भारतातील पर्यटनाला चालना देणे या उद्देशाने ‘चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा कॅम्पेन’ चा प्रारंभही पंतप्रधान करतील. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाच्या आधारे ही मोहीम सुरू केली जात आहे. यात त्यांनी परदेशात राहणाऱ्या भारतीयांना किमान 5 बिगर-भारतीय मित्रांना भारतात येण्यासाठी प्रोत्साहित करण्याची विनंती केली आहे. परदेशस्थ भारतीय, परदेशात राहणाऱ्या 3 कोटींहून अधिक भारतीयांसह, सांस्कृतिक सदिच्छादूताच्या रुपात भारतीय पर्यटनासाठी प्रभावी उत्प्रेरक म्हणून काम करु शकतील.

Continue reading

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
error: Content is protected !!