पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील उदयपूर (2), बांसवाडा (2), प्रतापगड (1) आणि डुंगरपूर या जिल्ह्यातील सहा एकलव्य आदर्श निवासी शाळांचे नुकतेच उद्घाटन केले. या शाळांच्या बांधकामामुळे 2880 आदिवासी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. यात विद्यार्थिनींची संख्या अर्धी आहे.

अनेक दशकांपासून खेड्यांमध्ये चांगल्या शाळा आणि शिक्षणाच्या अभावामुळे खेडी आणि गरीब लोक मागे पडल्याचे पंतप्रधान म्हणाले आणि मागासलेल्या आणि आदिवासी समाजातील मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणतेही साधन नव्हते याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, सध्याच्या सरकारने शिक्षणासाठी आर्थिक तरतूद आणि संसाधने वाढवली आणि एकलव्य निवासी शाळा उघडल्या ज्याचा आदिवासी तरुणांना मोठा फायदा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, 50% किंवा 20,000 हून अधिक अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेल्या आदिवासी तालुक्यात प्रत्येकी एक प्रमाणे 740 एकलव्य निवासी आदर्श शाळा स्थापन केल्या जात आहेत. 2021-22 मध्ये 452 नवीन मैदानी आणि डोंगराळ भागातील एकलव्य आदर्श निवासी शाळांसाठी बांधकामाची किंमत अनुक्रमे 20 कोटी आणि 24 कोटी रुपयांवरून वाढवून 38 कोटी आणि 48 कोटी रुपये करण्यात आली. पुढील 3 वर्षांत टप्प्याटप्प्याने 38,000 हून अधिक शिक्षकांची भर्ती केली जाईल. 2013-14 मध्ये 167 शाळांना मंजुरी देण्यात आली होती, ज्या आजपर्यंत 693 पर्यंत वाढल्या आहेत. 2013-14 मध्ये 119 शाळा कार्यरत होत्या, तर आजमितीस 401 शाळा कार्यरत आहेत, गेल्या 5 वर्षात 110 शाळांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

