Homeबॅक पेजराष्ट्रपती मुर्मू आज...

राष्ट्रपती मुर्मू आज अंदमानात पाहणार सेल्युलर जेल कॉम्प्लेक्स

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून म्हणजेच 19 तारखेपासून 23 फेब्रुवारीपर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांना भेट देणार आहेत. आज 19 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती हुतात्मा स्तंभावर पुष्पहार अर्पण करतील आणि सेल्युलर जेल कॉम्प्लेक्स आणि संग्रहालयाला भेट देतील. सेल्युलर जेलमधील लाईट अँड साउंड शोसाठीही त्या उपस्थित असतील. नंतर राष्ट्रपती पोर्ट ब्लेअर येथील डॉ. बी. आर. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला भेट देतील आणि त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी सत्काराला उपस्थित राहतील.

उद्या 20 फेब्रुवारीला राष्ट्रपती इंदिरा पॉईंट आणि कॅम्पबेल बेला भेट देतील. त्यानंतर त्या सुभाषचंद्र बोस बेटाला भेट देतील आणि लाईट अँड साउंड कार्यक्रमालाही त्या उपस्थिती लावतील.

21 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती पोर्ट ब्लेअरच्या राज निवास येथे अंदमान आणि निकोबार बेटांच्या पीव्हीटीजीच्या सदस्यांशी संवाद साधतील. त्याच दिवशी, राधानगर किनाऱ्यावर सैन्याने केलेल्या संचलन प्रात्यक्षिकाच्याही त्या साक्षीदार असतील.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content