Homeमुंबई स्पेशलराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज २ दिवसांच्या भेटीसाठी मुंबईत आगमन झाले. राष्ट्रपतींचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. आगमनानंतर लगेचच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तिन्ही सैन्यदलांतर्फे मानवंदना देण्यात आली.

राष्ट्रपतींनी आज दुपारी श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. यावेळी राज्यपाल रमेश बैसदेखील उपस्थित होते. श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. संध्याकाळी महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा राजभवन येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

उद्या दि. ७ रोजी राष्ट्रपती राजभवनातील ‘क्रान्तिगाथा’ या ब्रिटिशकालीन भूमिगत बंकरमध्ये तयार करण्यात आलेल्या क्रांतिकारकांच्या दालनाला भेट देणार असून त्यानंतर त्या शिर्डीकडे रवाना होणार आहेत.  

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content