Homeबॅक पेजटपाल खाते करणार...

टपाल खाते करणार मोफत वीजेसाठी नोंदणी!

भारतीय टपाल विभागाने पीएम सूर्य घर: मोफत वीज योजनेसाठी नोंदणी मोहीम सुरू केली आहे. सरकारच्या या भव्य उपक्रमामुळे छतावर सौर पॅनेल बसविण्‍यासाठी भरघोस अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे देशातील एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल, असा सरकारचा प्रयत्न आहे.

वीज

या योजनेअंतर्गत नोंदणीसाठी आता पोस्टमन आणि टपाल कर्मचारी मदत करणार आहेत. वीज बिलात मोठी बचत आणि स्वच्छ तसेच किफायतशीर ऊर्जा मिळविण्याकरीता भविष्यासाठी सर्व व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागाने केले आहे.

अधिक माहितीसाठी, https://pmsuryaghar.gov.in/ ला भेट द्यावी अथवा आपल्या विभागातील पोस्टमनशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयालाही भेट देता येऊ शकेल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content