Homeचिट चॅट‘WHO M-Yoga’ मोबाईल...

‘WHO M-Yoga’ मोबाईल ॲपचे पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ!

सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, भारत सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने विकसित केलेले ‘WHO M-Yoga’ या मोबाईल ॲपचा शुभारंभ केला.

या ॲपवर, योगप्रशिक्षणाचे अनेक व्हीडिओ विविध भाषांमध्ये उपलब्ध असतील. हे ॲप म्हणजे, प्राचीन विद्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुंदर मिलाफाचे उत्कृष्ट उदाहरण आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. M-Yoga ॲपमुळे जगभरात योगाचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होईल, तसेच ‘एक जग, एक आरोग्य’ साधण्याच्या प्रयत्नांतही हे ॲप महत्त्वाचे योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे मोबाईल ॲप योगाच्या प्रसारासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकेल. विशेषतः सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात त्याचा उपयोग होईल. कोविड रूग्णांची प्रकृती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी, त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यास उपयुक्त ठरेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

या ॲपमागची पार्श्वभूमी

योगाचा जगभरात प्रसार करण्याच्या उद्देशाने, जुलै 2019 रोजी जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालयादरम्यान एक सामंजस्य करार करण्यात आला होता. m-Yoga प्रकल्पात चार गोष्टींवर भर देण्यात आला आहे.

(1) सर्वांच्या निरामय आयुष्यासाठी सामान्य योगनियम;

(2) मानसिक आरोग्य आणि काटक शरीरासाठी योगाभ्यास;

(3) कुमारवयीन मुलांसाठी योगाभ्यास आणि,  

(4) मधुमेहाचा धोका असणारयांसाठी योगाभ्यास.

या चार मुद्यांवर आधारित आवश्यक माहिती असलेली एक छोटी पुस्तिका आणि मोबाईल ॲप्लिकेशन मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने, जागतिक आरोग्य संस्थेच्या तंत्रज्ञान सल्लागारांच्या सल्ल्याने विकसित केले आहे. या पुस्तिकेचे काम आता अंतिम स्वरूपात असून, शुभारंभ करण्यात आलेले ॲप, संयुक्त राष्ट्रांच्या सहा अधिकृत भाषांपैकी 2 भाषांमध्ये उपलब्ध आहे. या कामात मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

योगविषयक सामान्य प्रोटोकॉल पाळून, दैनंदिन योगाभ्यासासाठी 45 मिनिटे, 20 मिनिटे आणि दहा मिनिटांच्या कालावधीचे योगाभ्यास सत्र तयार करण्यात आले आहेत. त्याशिवाय, योगविषयक नियमांची पुस्तिका, व्हीडिओ, त्यांचे सहा भाषांमध्ये भाषांतर करण्याचे काम आणि आयुष मंत्रालयाच्या निर्देशांनुसार, पुस्तिकेची रचना तयार करण्याचे काम या संस्थेने केले आहे.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content