Wednesday, December 18, 2024
Homeमुंबई स्पेशलमहाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिरात...

महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिरात जलाभिषेकासही परवानगी

मुंबईतील बाबुलनाथ मंदिर येथे महाशिवरात्री साजरी करण्याबाबत स्थानिक आमदार व राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मंत्रालयात मंदिर ट्रस्ट व भाविक प्रतिनिधींची बैठक झाली. यंदा महाशिवरात्रीला मंदिरातील शिवलिंगावर बेल व फुल अर्पण करण्यासह जलाभिषेक करण्यासही परवानगी देण्याचा सुवर्णमध्य या बैठकीमध्ये काढण्यात आला.

बैठकीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन ठक्कर, विश्वस्त प्रदीप श्रॉफ यांच्यासह भाविकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोना काळात मंदिरात पूजाविधीबाबत प्रतिबंध लावण्यात आले होते. आयआयटीच्या एका अहवालानुसार शिवलिंगावर हळदी, कुंकू किंवा इतर पूजासाहित्य वाहिल्याने, चंदनाचा लेप लावल्याने शिवलिंगाची झीज, नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे जलाभिषेकाला मज्जाव करण्यात आला होता.

बाबुलनाथ

दरम्यान, भाविकांमधून मात्र पूजाविधी परत सुरू करण्याची मागणी होत होती. या मुद्द्यावर मंगलप्रभात लोढा यांनी मंदिर विश्वस्त व भाविक प्रतिनिधींची मंत्रालयात बैठक घेतली. त्यात महाशिवरात्रीला बेल व फुल अर्पण करण्यासह जलाभिषेक करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिर येथे मंदिर विश्वस्तांसह पोलीस प्रशासन आदी सर्वजण भाविकांच्या मदतीसाठी असतील. भाविकांनी सहकार्य करावे. शिवलिंगाची झीज, नुकसान होणार नाही यादृष्टीने काळजी घ्यावी. भाविकांच्या भावनाही महत्त्वाच्या आहेत. मंदिर आपल्या सर्वांचे आहे. त्याची सुरक्षा ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी महाशिवरात्री उत्साहात साजरी करावी, असे आवाहन लोढा यांनी बैठकीनंतर केले.

Continue reading

आंबेकर स्मृती कबड्डी स्वामी समर्थ, शिवशक्ती आणि विजय क्लबला जेतेपद

मुंबईत राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत बलाढ्य शिवशक्तीने डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबचा 35-30 असा पराभव करत जेतेपद पटकावले. पुरुषांच्या स्थानिक गटात विजय क्लबने जय...

दिव्यांग जिल्हास्तरीय स्पर्धेत सूर्योदय आरबीएल शाळेचे यश

पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग जिल्हास्तरीय स्पर्धेत वसईच्या सूर्योदय आरबीएल मतिमंद मुला-मुलींच्या शाळेने चमकदार कामगिरी करताना ३ सुवर्ण आणि ६ कांस्य पदकांची कमाई केली. त्यांच्या ओबेद डायसने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आणि गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदके मिळवली....

‘मर्दानी 3’चा तिसरा भाग ‘डार्क, डेडली आणि ब्रूटल’!

आदित्य चोप्रांची यशराज फिल्म्सची सुपरहिट फ्रेंचाइझी ‘मर्दानी’ गेल्या 10 वर्षांपासून प्रेक्षकांचे प्रेम जिंकत हिंदी सिनेमातील सर्वात मोठी सोलो फीमेल-लीड फ्रेंचाइझी ठरली आहे. या ब्लॉकबस्टर फ्रेंचाइझीला प्रचंड प्रेम मिळाले असून ती सिनेप्रेमींसाठी एक कल्ट स्टेट्स बनली आहे. ‘मर्दानी 2’च्या रिलीजच्या...
Skip to content