Sunday, December 22, 2024
Homeबॅक पेज'पेटीएम'चे लक्ष आता...

‘पेटीएम’चे लक्ष आता यूपीआय लाइट वॉलेटवर

भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी पेटीएमने आता यूपीआय लाइट वॉलेटवर लक्ष केंद्रित केले आहे. कमी मूल्याच्या दैनंदिन पेमेंट्ससाठी वॉलेटला पसंती देणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही सुविधा दिली जाणार आहे. पेटीएम यूपीआय लाइट ऑन-डिव्हाइस वॉलेटप्रमाणे काम करते. त्यामुळे वापरकर्ते यावर पैसे जमा करून ठेवू शकतात आणि झटपट पेमेंट करू शकतात. पिनची गरज नसल्याने पेमेंट्स विजेच्या वेगाने होतात आणि कधीच असफल ठरत नाहीत. यात वापरकर्त्यांना दिवसातून दोनदा २,००० रुपयांपर्यंत रक्कम वॉलेटमध्ये भरण्याची लवचिकता आहे. त्यामुळे दिवसभरात भरली जाणारी एकूण रक्कम ४,००० रुपयांपर्यंत जाते.

पेटीएमचे यूपीआय लाइट वॉलेट जलद, सुरक्षित व खात्रीशीर पेमेंट्सच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना ५०० रुपयांपर्यंतची पेमेंट्स तत्काळ तसेच अपयशी न ठरणाऱ्या व्यवहाराद्वारे करण्याची मुभा मिळते. किराणा मालाची खरेदी, पार्किंग शुल्क भरणे किंवा प्रवासाचे भाडे चुकते करणे अशी छोटी पेमेंट्स वारंवार करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही सेवा विशेषतत्वाने उपयुक्त आहे. यात कितीही पेमेंट्स केली तरी एण्ट्री एकदाच होत असल्यामुळे बँक स्टेटमेंट सुटसुटीत राहते. आर्थिक नोंदी सुटसुटीत ठेवण्यास प्राधान्य देणाऱ्या वापरकर्त्यांच्या दृष्टीने हे अत्यंत सोयीस्कर आहे. अशा शिस्तबद्ध पद्धतीमुळे वापरकर्त्यांना बँकेच्या पासबुकमध्ये असंख्य एण्ट्रीजची कटकट न लावून घेता छोटे दैनंदिन खर्च कार्यक्षमतेने करता येतात. यात पेमेंटसाठी पिनची गरज नसते. त्यामुळे आर्थिक व्यवहार सुटसुटीत व सुलभ होतात.

पेटीएम

पेटीएम अॅपवर यूपीआय लाइट पेमेंट्स एनेबल करण्याच्या पायऱ्या-

१. पेटीएम अॅपवर जा आणि होमपेजवरील ‘यूपीआय लाइट अॅक्टिव्हेट’ आयकॉनवर क्लिक करा.

२. तुम्हाला यूपीआय लाइटसोबत वापरायचे असलेले बँकखाते निवडा.

३. पेमेंट सुरू करण्यासाठी तुम्हाला यूपीआय लाइटवर जी रक्कम जमा करायची आहे, ती भरा.

४. यूपीआय लाइट खाते तयार करण्यासाठी एमपीआयएनची पडताळणी करा.

५. सुलभ व वन-टॅप पेमेंट्ससाठी तुमचे यूपीआय लाइट खाते तयार झाले आहे.

त्यापुढे यूपीआय लाइट वॉलेट वापरून पेमेंट्स करण्यासाठी कोणताही यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करा किंवा मोबाइल क्रमांक भरा किंवा फोनच्या कॉण्टॅक्ट यादीतून इच्छित क्रमांक निवडा. वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) आणि अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि येस बँक यांच्यासारख्या आघाडीच्या पेमेंट सिस्टम प्रोव्हायडर्समधील (पीएसपी) सहयोगामुळे तुमच्या यूपीआय व्यवहारांसाठी आता एक ठोस व खात्रीशीर चौकट मिळते आणि वापरकर्त्यांना पेमेंटचा अखंड व सुरळीत अनुभव मिळवून देण्यास मदत होते.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content