Homeबॅक पेजपेटीएमने केली ट्रॅव्‍हल...

पेटीएमने केली ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा

पेटीएम, या भारतातील आघाडीच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनीने पेटीएम ट्रॅव्‍हल कार्निवलच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या ट्रॅव्‍हल कार्निवलदरम्‍यान ट्रॅव्‍हल बुकिंगवर विशेष फेस्टिव्‍ह सूट देण्‍यात येणार आहे. ५ ऑक्‍टोबरपर्यंत वापरकर्ते फ्लाइट्सवर जवळपास ५,००० रूपयांची बचत करू शकतात आणि बस बुकिंग्‍जवर २५ टक्‍के सूट म्‍हणजेच जवळपास ५०० रूपये बचतीचा आनंद घेऊ शकतात.

कंपनीने वापरकर्त्‍यांना अतिरिक्‍त बचत देण्‍यासाठी आयसीआयसीआय बँक, आरबीएल बँक, बँक ऑफ बडोदा आणि एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक अशा आघाडीच्‍या बँकांसोबत सहयोग केला आहे. प्रवासी देशांतर्गत फ्लाइट्सवर जवळपास १५ टक्‍के सूट आणि आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्सवर जवळपास १० टक्‍के सूटचा लाभ घेण्‍यासाठी प्रोमो कोड्सचा वापर करू शकतात, जसे आयसीआयसीआय बँकेसाठी ‘आयसीआयसीआयसीसी’, आरबीएल बँकेसाठी ‘फ्लायआरबीएल’, बँक ऑफ बडोदासाठी ‘बॉबसेल’ व एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेसाठी ‘एयूसेल’. तसेच, पेटीएमची तिकिट अशुअर सेवा कन्‍फर्म रेल्‍वे तिकिटांची खात्री देते, तर बुकिंग्‍ज यूपीआयच्‍या माध्‍यमातून विनाशुल्‍क दिली जातात. वापरकर्ते रेल्‍वे तिकिटांसाठी फक्‍त ४९ रूपयांपासून मोफत कॅन्‍सलेशनचादेखील अवलंब करू शकतात.

पेटीएमचे प्रवक्‍ता म्‍हणाले की, सणासुदीचा काळ जवळ आला असताना आणि देशभरातील लोक त्‍यांच्‍या मूळगावी किवा सुट्टीतील धमालीसाठी प्रवासाचे नियोजन करत असताना आम्‍हाला विशेष ऑफर्स सादर करण्‍याचा आनंद होत आहे. त्यामुळे त्‍यांचा प्रवास अधिक किफायतशीर व सुखकर होईल. आघाडीच्या बँकांसोबत सहयोगासह आमचा फ्लाइट्स, रेल्‍वे व बसेसवर बचत देण्‍याचा मानस आहे, ज्‍यामधून लाखो पेटीएम वापरकर्ते विनासायास प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content