Homeएनसर्कल‘ऑपरेशन थिरवल्लूर’ सुरू!

‘ऑपरेशन थिरवल्लूर’ सुरू!

पुणे येथील दक्षिण कमांड, सैनिकांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आजपासून “ऑपरेशन थिरवल्लूर” सुरू केले आहे.

लष्कराकडून नागरी प्रशासनाला मदत करण्याच्या हेतूने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत, तामिळनाडूमधील थिरवल्लूर जिल्ह्यातील गुम्मीडीपुंडी येथील राज्य औद्योगिक विकास  महामंडळ तामिळनाडू मर्यादितच्या औद्योगिक वसाहतीतील क्षेत्रात जुन्या कारखान्यातून कदाचित अनावधानाने गोळा केलेल्या, स्फोट न झालेल्या 10 टन दारूगोळ्यांची सुरक्षितरित्या विल्हेवाट लावण्यात आली.

नागरी अधिकाऱ्यांबरोबर तपशीलवार नियोजन आणि सहकार्यातून गेल्या अनेक आठवड्यांपासून क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा हा प्रत्यत्न सुरू असून ही एक उत्कृष्ट मोहीम आहे. लष्कर आणि तामिळनाडू राज्य सरकार यांच्या संयुक्त समन्वय आणि नियोजनाच्या माध्यमातून हे करण्यात आले. त्यांच्या विनंतीवरून संरक्षण मंत्रालयाने या मोहिमेला विशेष मान्यता दिली.

गुम्मीडीपुंडी आणि आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेअंतर्गत, धातूचे भंगार असलेल्या  दारुगोळ्याच्या कोठारातून सापडलेल्या, स्फोट झाला नसलेल्या आयुधांचे वर्गीकरण करून आणि त्याची विल्हेवाट लावल्यानंतर, ती आता जमिनीखाली पुरण्यात आली.

काही वर्षांपूर्वी झालेल्या हिंसक स्फोटात एका कारखान्यातील कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर हे दारुगोळ्याचे कोठार उघडकीला आले होते. ही मोहीम आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content