Homeमुंबई स्पेशलराणी बागेतल्या पुष्प...

राणी बागेतल्या पुष्प प्रदर्शनाचा आनंद लुटला दीड लाख प्रेमींनी..

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पुष्पोत्सव (Flowershow-२०२४) अत्यंत दिमाखात साजरा झाला. विविध वृक्षप्रेमी, विद्यार्थी, बॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेते व इतर क्षेत्रातील मान्यवर यांच्यासोबतच जवळपास १.५ लाख मुंबईकरांनी या प्रदर्शनास भेट दिली. सर्वच वयोगटातील निसर्गप्रेमींनी या त्रिदिवसीय सोहळ्याचे तोंड भरून कौतुक केले आणि निसर्गाच्या विविधतेचा मनमुराद आनंद लुटला. तरुणाईद्वारे social media वरदेखील बहुसंखेने फोटो व रीलदेखील काढले गेले.

प्रदर्शन

याच पुष्पोत्सवाचा दुसरा अंक म्हणजेच “उद्यान विद्या विषयक कार्यशाळा (Workshop on Horticulture) याचे आयोजन उद्यापासून ०९ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय (Mumbai Zoo) म्हणजेच पूर्वाश्रमीच्या राणी बागेतील ३-डी सभागृहात होणार आहे. यासाठी व्याख्याते म्हणून संबंधित क्षेत्रातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, व अनुभवी तज्ञ दर्जाचे मंडळी शिकवणी देणार आहेत.

मुबईतील नागरिकांना झाडांचे, पर्यावरणाचे  महत्त्व व जागरूकता निर्माण करणे तसेच इच्छुक नागरिकाना या कार्यशाळेतील विविध विषयांद्वारे मूलभूत शिकवण देणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या कार्यशाळेचे आयोजन केले जाते. याकरिता नाममात्र १०००/- इतके शुल्क आकारले जाणार आहे. यावर्षीदेखील बॉन्साई बनविण्याचे तंत्र, मियावाकी पद्धतीची वृक्ष लागवड, वर्टिकल गार्डनिंग, किचन गार्डनिंग व बाल्कनीतील झाडांची जोपासना, आयुर्वेद आणि जीवनशैली इत्यादी विषयांवर ही कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे.

नोंदणीकरिता नागरिक थेट राणी बागेतील कार्यालयात संपर्क करू शकतात अथवा उद्यान खात्याचे अधिकारी सहाय्यक उद्यान अधीक्षक अमित करंदीकर (मोबाईल नंबर – 9323163622) व उद्यान विद्या सहाय्यक प्रतिभा ठाकरे (मोबाईल नंबर – 8692030699) यांच्याशी संपर्क करून मार्गदर्शन प्राप्त करू शकतात. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना महानगरपालिकेद्वारे प्रशस्तीपत्रदेखील देण्यात येईल. त्यामुळे या संधीचा फायदा जास्तीतजास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले.

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content