Homeबॅक पेजओएनडीसी ठरले स्टार्ट...

ओएनडीसी ठरले स्टार्ट अप्सना डिजिटल व्यापारासाठी व्यासपीठ

उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या (डीपीआयआयटी) वतीने काल नवी दिल्लीतील वाणिज्य भवन इथे ओएनडीसी, अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजीटल कॉमर्स स्टार्टअप महोत्सवाचे आयोजन केले होते. अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने राबवलेले दोन महत्त्वाचे उपक्रम, स्टार्ट अप इंडिया आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स यांचे  यश प्रतिकात्मकरित्या साजरा करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

डीपीआयआयटीचे सचिव राजेश कुमार सिंह यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. देशात स्टार्टअप्सचा विकास आणि  नवोन्मेषासाठी परिसंस्थेचे संवर्धन व प्रोत्साहन यासाठी केंद्र सरकारची वचनबद्धता राजेश कुमार सिंह यांनी यावेळी अधोरेखित केली. या कार्यक्रमात प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि डिजिटल माध्यम अशा  हायब्रीड पद्धतीने सुमारे पाच हजार स्टार्टअप्स सहभागी झाले होते.

सहभागी झालेल्या स्टार्टअप, युनिकॉर्न तसेच इझ माय ट्रिप, ऑफ बिझनेस, विन्झो, लिव्हस्पेस, ग्लोबलबीज, प्रिस्टीन केअर, कार्स ट्वेंटी फोर, फिजिक्सवाला, पॉलिसी बझार आणि झिरोधा यासारख्या वेगाने वाढत असलेले उद्योग आणि या परिसंस्थेचा भाग असलेल्या 125पेक्षा जास्त भागधारकांनी लेटर ऑफ इंटेन्ट अर्थात हमीपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. या हमीपत्राच्या माध्यमातून ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सची (ONDC) क्षमता आणि त्यांच्यासोबतच्या भागिदारीत जोडले जाण्यासाठी देशातील अग्रगण्य स्टार्टअप्समध्ये असलेल्या उत्सुकतेचीच साक्ष मिळाली.

डीपीआयआयटीचे सहसचिव संजीव यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. कल्पकतेला चालना देत, स्पर्धेचा विस्तार करत आणि ग्राहकांसमोरच्या पर्यायांची संख्या वाढवण्याच्या माधयमातून अनेक स्टार्टअप्स ओएनडीसीसारख्या परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतील असे त्यांनी सांगितले.

‘ओएनडीसी स्टार्टअप महोत्सव’हा ओएनडीसी आणि स्टार्टअप इंडिया उपक्रमासोबतची नाविन्यपूर्ण भागिदारी आहे. ओएनडीसी या व्यासपीठासोबत 5 लाखांपेक्षा जास्त विक्रेते जोडले गेले आहेत. यापैकी  70%पेक्षा अधिक विक्रेते लहान किंवा मध्यम स्वरुपाच्या व्यवसायातील विक्रेते आहेत. मागच्या महिन्यात, एप्रिल 2024मध्ये ओएनडीसी या व्यासपीठावरून सुमारे 7.22 दशलक्ष व्यवहार झाले होते.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content