दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या, २३ जानेवारीला जयंती. यानिमित्त मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील ठाकरे यांचे स्मृतीस्थळ मुंबई महापालिकेच्या वतीने सुशोभित करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या जी उत्तर विभागाचे कनिष्ठ वृक्ष अधिकारी रूपेश पुजारी यांच्या पथकाने हे सुशोभिकरण केले. साधारण १५ कर्मचाऱ्यांनी आठवडाभर राबत हे सुशोभिकरण केले.
मॅरीगोल्ड ऑरेंज, पांढरी शेवंती, पॉईनसेटीया रेड, पॉईनसेटीया यलो, जरबेरा, कार्पेट लॉनचा वापर यात करण्यात आला. साधारण दीड हजार रोपांचा वापर याकरीता करण्यात आला.