Homeमुंबई स्पेशल२२ जानेवारीला विलेपार्ल्यात...

२२ जानेवारीला विलेपार्ल्यात ‘प्रभु आले मंदिरी…’

अयोध्या येथील नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात प्रभू श्रीरामाची नूतन बालमूर्ती स्थापित करून तिची प्राणप्रतिष्ठा सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ या शुभदिनी होत असल्याचा क्षण मोठ्या एलईडी स्क्रीनवर अनुभवत या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विलेपार्ले कल्चरल सेंटर आणि श्री रामांजनेय देवस्थान (मद्रासी राम मंदिर) यांच्या सहयोगाने आर्च एंटरप्रायझेसच्या ‘प्रभु आले मंदिरी..’ या विशेष स्वरसोहळ्याचे आय़ोजन आमदार पराग अळवणी यांनी केले आहे. हा सोहळा सकाळी ९ वाजता मुंबईतल्या श्री रामांजनेय देवस्थान, सुभाष रोड, विलेपार्ले पूर्व येथील लक्ष्मी नारायण हिरवळीवर होणार आहे.

प्रभू

काव्या खेडेकर आणि अमृती धुमे यांच्या श्रीरामगीतांनी या सोहळ्याचा शुभारंभ होईल. त्यानंतर भारतरत्न स्व. पं. भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व) यांची विशेष स्वर प्रस्तुती, श्रीरामचंद्रांच्या अयोध्येहून वनवासासाठी प्रयाण ते रावणवध करून अयोध्याला पुनःर्गमन ह्यावर आधारित गीत रामायणातील लोकप्रिय गीतांच्या साथीने नृत्याविष्कार कथ्थक गुरु पूजा पंत आणि त्यांच्या सहनृत्यांगना हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर यावेळी अर्चना गोरे, मंदार आपटे यांचे गायनदेखील होईल. या स्वरसोहळ्याची संकल्पना विनीत गोरे यांची असून निरुपण डॉ. समिरा गुजर-जोशी करतील. अधिकाधिक नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अळवणी यांनी केले आहे. 

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content