Homeब्लॅक अँड व्हाईटहॉलमार्कचे उल्लंघन, अंधेरीतील...

हॉलमार्कचे उल्लंघन, अंधेरीतील दागिन्यांच्या दुकानावर छापा!

भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या मुंबई शाखा कार्यालय-I च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या अंधेरी पूर्व येथील एका दागिन्यांच्या दुकानावर छापा टाकला. गोल्ड अँड ज्वेलरी आणि गोल्ड आर्टिफॅक्ट्स ऑर्डर, 2020च्या हॉलमार्किंग नियमाच्या उल्लंघनाबाबत मिळालेल्या माहितीवर त्वरीत कारवाई करत, भारतीय मानक ब्युरो चमूने, मे. व्हेरायटी ज्वेलर्स, अंधेरी (पूर्व), मुंबई येथे छापा टाकला. या दुकानात हॉलमार्किंगशिवाय तसेच 1 जुलै 2021 पूर्वी अस्तित्त्वात असलेल्या जुन्या BIS हॉलमार्कचे सोन्याचे दागिने विकले जात असल्याचे या छाप्यात आढळून आले आहे.

या छाप्यात, भारतीय मानक ब्युरो कायदा 2016 च्या कलम 15 (3) आणि 17(1) च्या तरतुदींनुसार, BIS हॉलमार्किंग शिवाय तसेच जुने हॉलमार्किंग (जे 1 जुलै 2021 पूर्वी अस्तित्वात होते) असलेले बहुसंख्य सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. भारतीय मानक ब्युरो कायदा 2016 च्या कलम 15 (3) A 17(1) चे उल्लंघन करणाऱ्यास दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा किंवा किमान 2,00,000 रुपये दंड किंवा या दोन्हीची तरतूद आहे. या गुन्ह्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मुंबई शाखा कार्यालय-1 प्रमुख आणि वरिष्ठ संचालक सतीश कुमार यांनी दिली.

भारतीय मानक ब्युरो कायदा, 2016 नुसार, कोणतीही व्यक्ती वैध परवान्याशिवाय, हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी आणि गोल्ड आर्टिफॅक्ट्स ऑर्डर, 2020 अंतर्गत समाविष्ट असलेली कोणतीही वस्तू BIS हॉलमार्कशिवाय विक्रीसाठी प्रदर्शित करू शकत नाहीत. म्हणून, सर्व ग्राहकांना बीआयएस प्रमाणन अनिवार्य असलेल्या उत्पादनांची यादी शोधण्यासाठी बीआयएस केअर ॲप (जे मोबाईल अँड्रॉइड आणि iOS दोन्हीमध्ये उपलब्ध) वापरण्यास प्रोत्साहित केले जाते आणि खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावरील हॉलमार्कची वास्तविकता भारतीय मानक ब्युरोची वेबसाइट https://www.bis.gov.in/  ला भेट देऊन तपासण्याचे आवाहन केले जात आहे.

याशिवाय, नागरिकांना आवाहन केले जाते की बीआयएस प्रमाणपत्र अनिवार्य असलेली उत्पादने प्रमाणपत्राशिवाय विकली जात असल्याचे किंवा कोणत्याही उत्पादनाबाबत हॉलमार्कचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास त्याची माहिती ‘प्रमुख, मुंबई शाखा कार्यालय-I , पश्चिम प्रादेशिक कार्यालय, भारतीय मानक ब्युरो, 5 वा मजला, CETTM कॉम्प्लेक्स, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई – 400076 यांना दिली जाऊ शकते. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content