उद्यान उत्सव-1, 2024 अंतर्गत राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 31 मार्च 2024पर्यंत जनतेसाठी खुले असणार आहे. आता पर्यटक सोमवार वगळता आठवड्यातून सहाही दिवस सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या कालावधीत उद्यानाला भेट देऊ शकतात (अंतिम प्रवेश– सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत). यापूर्वी हे उद्यान जनतेसाठी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत खुले असायचे (अंतिम प्रवेश– सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत).
अभ्यागतांना या उद्यानाला भेट देण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावी लागेल.
https://visit.rashtrapatibhavan.gov.in/visit/amritudyan/rE
नोंदणी न करता प्रत्यक्ष भेट देणाऱ्या (वॉक-इन) अभ्यागतांना राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 12जवळील सुविधा केंद्रावर किंवा सेल्फ सर्व्हिस कियॉस्कवर (स्वयंसेवा केंद्रावर) स्वतःची नोंदणी करावी लागेल.