Homeन्यूज अँड व्ह्यूजआता नव्याने दुमदुमणार...

आता नव्याने दुमदुमणार भारतीय दलित पँथरची भिमगर्जना!

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय दलित पँथर पुनरूज्जीवित करण्यात येणार आहे. राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, साहित्यीक, पत्रकारांशी आणि निवडक ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी विचारविनीमय केल्यानंतर आठवले यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

या बदलत्या राजकीय सामाजिक घडामोडीत रिपब्लिकन पक्षाची भविष्यातील वाटचाल काय असेल यावर आज विचारमंथन करण्यात आले. त्यात रिपब्लिकन पक्षांशी संलग्न असणाऱ्या सामाजिक संघटनेची स्थापना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त झाले. ज्या दलित पँथरच्या चळवळीतून रामदास आठवलेंचे नेतृत्त्व उभे राहिले त्या भारतीय दलित पँथरची पुर्नस्थापना करावी अशी सूचना या बैठकीत सर्वसंमतीने मंजूर झाली. त्यामुळे आगामी काळात रामदास आठवले यांची भारतीय दलित पँथर पुन्हा एकदा भिमगर्जना करेल आणि भारतीय दलित पँथरचे वादळ पुन्हा तरुणांमध्ये घोंगावताना दिसेल, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

1970च्या दशकात दलित पँथरची स्थापना झाली. दलित पँथर राजा ढाले यांनी विसर्जित केल्यानंतर रामदास आठवले यांच्या पुढाकारात भारतीय दलित पॅंथरचे संगठन उभे राहिले. आणि ते देशभर भारतीय दलित पँथर रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वात वादळासारखे घोंगावत राहिले. दलितांच्या सामाजिक प्रश्नांवर त्यांनी प्रचंड मोठी आंदोलने केली. एक आक्रमक कृतीशील सामाजिक संघटन म्हणून भारतीय दलित पँथरने देशभरातील दलितांचा विश्वास संपादित केला. त्या विश्वासावर रामदास आठवले यांच्यातला पँथर भिमगर्जना करीत देशभर आणि जगभर यांचे नेतृत्त्व पोहोचले.

आता पुन्हा रामदास आठवले पँथरच्या आवेशात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात भिमगर्जना करणार आहेत. त्यामुळे नव्या पिढीच्या हाती भारतीय दलित पँथरचे क्रांतीकारी आक्रमक संघटन ते सोपवणार आहेत. आठवले यांच्यातला पँथर पुन्हा अन्याय-अत्याचारांवर झेप घेणार आहे. या बैठकीला विचारवंत साहित्यीक शरणकुमार लिंबाळे, एड. दिलीप काकडे, रिपाइंचे अविनाश महातेकर, आजचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, गौतम सोनवणे, बाबुराव कदम, मिलींद शेळके, ब्रह्मानंद चव्हाण, परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे आदी उपस्थित होते.  

Continue reading

आज दुपारी 12 वाजता साजरा करा श्रीराम जन्मोत्सव!

आज श्रीरामनवमी! श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत! धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा...

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....
Skip to content